Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी बातमी : भीषण अपघात: लग्नानंतर माहेरी परतणाऱ्या नववधूचा काळाने ओढला घाला; ६ जण गंभीर

क्राईम

मोठी बातमी : भीषण अपघात: लग्नानंतर माहेरी परतणाऱ्या नववधूचा काळाने ओढला घाला; ६ जण गंभीर

Editorial DeskBy Editorial DeskApril 29, 2026Updated:April 29, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​धरणगाव प्रतिनिधी | नुकताच विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या उत्साहात माहेरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास क्रूझर गाडीचे चाक चालत्या प्रवासात निखळल्याने भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत २२ वर्षीय नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

​लग्नाच्या आनंदावर विरजण :
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. सर्वजण क्रूझर गाडीने (क्रमांक MH 30 AZ 4710) प्रवास करत होते. वापीहून अकोल्याकडे जात असताना वराड गावाजवळ अचानक गाडीचे एक चाक निखळले. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन हा भीषण अपघात झाला.

​एकाच कुटुंबातील तिघांचा अंत :
या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, नववधू पूजा वागडकर हिच्यासह दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय ५२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ज्या घरात लग्नाची सनई वाजत होती, तिथे आता आक्रोश पाहायला मिळत आहे. या घटनेने वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अकोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​सहा जखमींवर उपचार सुरू :
या अपघातात प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय अंश नितेश काठोडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

​अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

accident crime crime news
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add