भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. मध्य-पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे. याचा फटका थेट सर्व सामान्य जनतेला बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सध्या घरगुती गॅस, डिझेल…
Author: Editorial Desk
या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव – शहरातील हनुमानवाडी परिसरात दि. १५) रात्री झालेल्या फायरींगमध्ये एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जखमीचे नाव सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, रेल्वे स्टेशनजवळ, चाळीसगाव) असे असून ते रिक्षा चालक आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित महेंद्र मोरे , मेहुल रत्नपाल गोरे , कृष्णा जिभाऊ शेळते (सर्व रा. चाळीसगाव) तसेच अन्य दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या…
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ७३ वी जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ७३ वी जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५–२६ स्व. बबन भाऊ बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १४ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या २६ संघांनी तर मुलींच्या ६ संघांनी सहभाग नोंदवला. जळगाव, भुसावळ, भडगाव, पाचोरा, एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये पुरुष गटात महाबली क्रीडा प्रसारक मंडळ, भुसावळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.अंतिम सामन्यात…
रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट दक्षता आणि कार्यतत्परता दाखवली भुसावळ प्रतिनिधी : रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट दक्षता आणि कार्यतत्परता दाखवली आहे. भुसावळ विभागातील सुविधा विभागात कार्यरत असलेले तिकीट तपासणी कर्मचारी श्री. सी. पी. बाढे यांनी दिनांक १५ मार्च २०२६ रोजी तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावली.सतर्क व पद्धतशीर तिकीट तपासणीद्वारे श्री. बढे यांनी तिकीटविरहित/अनियमित प्रवासाच्या एकूण ७८ प्रकरणांची नोंद करत ₹२,५७,६५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नियमित व कडक तिकीट तपासणी मोहिमेमुळे तिकीटविरहित प्रवासाला आळा बसण्यास मदत होते तसेच वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना योग्य आसनव्यवस्था आणि अधिक…
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर वरणगाव नगरपरिषद येथे दि१६ मार्च रोजी आयोजित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली होती. वरणगाव प्रतिनिधी : मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर वरणगाव नगरपरिषद येथे दि१६ मार्च रोजी आयोजित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली होती. शिबिर रद्द झाल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे . या अनुषंगाने तहसीलदारांच्या प्रतिनिधी नायब तहसीलदार प्रीती लुटे यांच्या उपस्थितीत शिबिराच्या पूर्वतयारीची बैठकही पार पडली होती. मात्र, शिबीर प्रत्यक्ष दिवशी पुढे ढकलल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सकाळपासूनच वरणगाव नगरपरिषद येथे सुमारे ३०० च्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. रेशन कार्डसंदर्भातील नोंदणी, १४ अंकी क्रमांक मिळविणे, नाव वाढवणे किंवा…
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता राज्य सरकारकडून एकाचवेळी देण्याचे संकेत मिळाले असून हा निधी एप्रिल महिन्यात १५ तारखेपूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी ई-केवायसी न केलेल्या महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सादर…
गॅस दरवाढीने चालक हैराण ; रिक्षा भाडेवाढीने प्रवाशांना फटका जळगाव । इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसचा तुटवडा आणि गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सी आणि पंपांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना पहाटेपासून सिलेंडरसाठी थांबावे लागत असून ऑनलाईन बुकिंगही सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव शहरातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शहरात एकूण तीन एलपीजी गॅस…
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला जळगाव । पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विजय भिमा राठोड असं मयत तरुणाचे नाव आहे. तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव असं अटक केलेल्या पती,पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी काय आहेत घटना? मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय राठोड याने आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती तिच्या पती संजय…
केंद्र सरकारचा रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय; राज्यांना दिल्या सूचना? जळगाव । तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य वितरण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात जून २०२६ पर्यंत ३ महिन्याचे वितरित होणारे तांदूळ आणि गहू केंद्रीय साठ्यातून आगाऊ उचलून नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्यांच्या अन्न सचिवांना पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे. केंद्राच्या पत्रानुसार, आगामी गहू खरेदी हंगाम सुरू होणार असल्यामुळे गोदामांवर ताण येऊ नये यासाठी राज्यांनी नियोजित वाटपातील धान्य लवकर उचलावे. साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थेवरील दबाव लक्षात घेऊन लाभार्थ्यांपर्यंत धान्य त्वरित पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी…
जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील तरवाडे येथे स्मशानभूमी जवळ सुरू असलेल्या झन्ना मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी ५ जणांना ताब्यात घेतले गेले, तर दोन जण पळून गेले.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या जुगारींकडून जुगाराची साधने, १४,८९० रुपये रोकड, ३८,००० रुपये किंमतीचे मोबाईल आणि १,१०,००० रुपये किंमतीच्या तीन दुचाकी असा एकूण १,६२,८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले. एएसआय युवराज नाईक , हवालदार ओंकार सुतार , संदीप पाटील , पोकोन , विजय पाटील , श्रीराम कांगणे यांनी गुरुवारी (१२…

