Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात फायरींग; रिक्षाचालक जखमी

ताज्या बातम्या

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात फायरींग; रिक्षाचालक जखमी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव – शहरातील हनुमानवाडी परिसरात दि. १५) रात्री झालेल्या फायरींगमध्ये एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जखमीचे नाव सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, रेल्वे स्टेशनजवळ, चाळीसगाव) असे असून ते रिक्षा चालक आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित महेंद्र मोरे , मेहुल रत्नपाल गोरे , कृष्णा जिभाऊ शेळते (सर्व रा. चाळीसगाव) तसेच अन्य दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास हनुमानवाडी येथील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. त्यावेळी एका आरोपीने कट्ट्याचा ट्रिगर दाबल्याने गोळी सुटून ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यावर लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी चाळीसगाव सिटी पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.सदर घटनेमागील कारणाचा तपास सुरू असून कविता नेरकर पवार (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ) आणि विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add