Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जुगार खेळणे महागात पडले; १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

जुगार खेळणे महागात पडले; १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Editorial DeskBy Editorial DeskMarch 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली.

चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील तरवाडे येथे स्मशानभूमी जवळ सुरू असलेल्या झन्ना मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी ५ जणांना ताब्यात घेतले गेले, तर दोन जण पळून गेले.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या जुगारींकडून जुगाराची साधने, १४,८९० रुपये रोकड, ३८,००० रुपये किंमतीचे मोबाईल आणि १,१०,००० रुपये किंमतीच्या तीन दुचाकी असा एकूण १,६२,८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही माहिती सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले. एएसआय युवराज नाईक , हवालदार ओंकार सुतार , संदीप पाटील , पोकोन , विजय पाटील , श्रीराम कांगणे यांनी गुरुवारी (१२ मार्च) सकाळी १० वाजता छापा टाकला.या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या ५ जणांसह फरार दोन जुगारींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add