याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा – तालुक्यातील वैजापुर ते चोपडा जाणारे रोडवर बोर अजंटी शिवारात बापु नरसिंग बारेला यांचे शेताजवळ इम्रान रहेमान पठाण (वय २१, रा. सातोना खुर्द, ता. परतुर, जि. जालना), रहेमान निहामत पठाण (वय ५९, रा. सातोना खुर्द, ता. परतुर, जि. जालना, अतिक रफिक शेख (वय ४५, रा. सातोना खुर्द, ता. परतूर, जि. जालना) यांना गांजाची तस्करी करतांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून २ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १३ किलो २५४ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश टाक करत आहे.
Author: Editorial Desk
विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सात आरोपींना रंगेहात अटक केली भुसावळ प्रतिनिधी : वरणगाव ता भुसावळ पिंपळगाव खुर्द शिवारात विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सात आरोपींना रंगेहात अटक केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सोनल आपसिंग पावरा यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक १९ मार्च २०२६ रोजी पहाटे सिनीयर टेक्निशियन विनोद प्रभाकर तायडे यांनी त्यांना फोनद्वारे पिंपळगाव खुर्द येथील शेतातील विद्युत डीपी (ट्रान्सफॉर्मर) चोरीस गेल्याची माहिती दिली.त्यानंतर सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संबंधित ठिकाणी महावितरण कंपनीचा ६३ केव्हीए क्षमतेचा ग्रे रंगाचा…
अपहरण केल्याची गंभीर घटना भुसावळ बाजारपेठ परिसरात घडली आहे. भुसावळ प्रतिनिधी : प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणावर मारहाण करून त्याच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची गंभीर घटना भुसावळ बाजारपेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित नातेवाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारदार चेतन जंगले (वय 25, रा. खडका, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दीड वर्षांपासून ओळखीतील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी 18 मार्च 2026 रोजी नाशिक येथे जाऊन विवाह केला. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली. 19 मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात विवाहाची माहिती दिल्यानंतर ते आपल्या मामाच्या घरी मुक्कामी होते. 20 मार्च रोजी सकाळी संबंधित तरुणीचे काही नातेवाईक तेथे आले.…
शेतकरी, शासन, आणि विमा कंपनीचा केला विश्वासघात. यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील एकूण ८ सीएससी सेंटर चालकांनी शेतकऱ्यांची,शासनाची व विमा कंपनीचा विश्वासघात करून १६ ते १७ कोटी रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला तालुका कृषी अधिकारी यांनी दिल्याने तालुक्यातील एकूण ८ सी एस सी सेंटर केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकारणासह शेतकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी यावल पोलिसातदिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यावल तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा आंबिया बहार योजनेअंतर्गत योजनांची अंमलबजावणी ही भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात येत आहे. तालुक्यात सन २०२५-२६ मध्ये केळी पिकासाठी प्राधान्याने फळपिका…
ओझर गावाजवळ संयुक्त कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला चाळीसगाव : येथील शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासोबत १८ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ओझर गावाजवळ संयुक्त कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणात आरोपी शेहजाद अहमद याकूब मोहम्मद (रा. ए वन पॅलेस सोसायटी, नवसारी, गुजरात) यास ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सुमारे ९६ गोण्या विमल व इतर सुगंधित तंबाखूचा साठा तसेच अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे वाहन…
ठाकरेंचे निम्म्याहून अधिक खासदार शिंदेंच्या संपर्कात? लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद, नगरपंचायत या निवडणुका झाल्यानंतर आता राजकीय वातावरण स्थिर होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी आता शिंदेंनी खासदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यातील ४ खासदार पक्षप्रवेशासाठी अतिशय सकारात्मक असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र…
वादात सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येत आहे. वादात सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला. वाल्मिक कराडशी संबंध असल्यामुळे मुंडे, शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे माणिकराव कोकाटे तर भोंदूबाबा अशोक खरातशी असलेले निकटचे संबंधांमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. एकंदरीत महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची ही तिसरी विकेट पडली आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात सध्या एक वेगळाच कल दिसून येत आहे. महायुती सरकारमधील राष्ट्रवादी…
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले जळगाव । युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून दुसरीकडे नंबर लावल्यावरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले असून अशातच घरगुती वापराच्या सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून धाडसत्र राबविले जात आहे. गेल्या आठवडाभरात २८१ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर घरगुती १९ सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने १८ हजार १३४ रुपये किमतीचे सिलिंडर जप्त केले आहेत. काळाबाजार घरगुती गॅसचा रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथके नेमण्यात आली. ठिकठिकाणी महसूल विभाग छापेमारी करत आहे. यात…
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे. जळगाव। रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात होताच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे. यंदा गहू, हरभरा व मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असली, मात्र यंदा सर्वाधिक चर्चेत आहे ते ‘दादर’ पीक. कमी लागवड आणि वाढती मागणी यामुळे दादरला विक्रमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १६ मार्च रोजी बाजार समितीत दादरला शासनाच्या ₹३,४२१ हमीभावाच्या तुलनेत तब्बल ₹५,१०० प्रति क्विंटल दर मिळाला. म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे ₹२ हजारांनी अधिक भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी सुखावला आहे. यंदा दादरचे क्षेत्र कमी राहिल्याने बाजारात आवक मर्यादित आहे,…
‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले जळगाव |राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी तब्बल १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. प्रवाशांना अखंडित आणि विनाअडथळा सेवा मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.प्रताप सरनाईक म्हणाले की, नियमित कर्मचारी भरतीसाठीचा प्रस्ताव सध्या अर्थ विभागाकडे…

