Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»रब्बी हंगामाच्या बाजार समितीत ‘दादर’ला सोन्याचा भाव! हमीभावापेक्षा मिळाला’ दर, शेतकरी खुश..

ताज्या बातम्या

रब्बी हंगामाच्या बाजार समितीत ‘दादर’ला सोन्याचा भाव! हमीभावापेक्षा मिळाला’ दर, शेतकरी खुश..

Editorial DeskBy Editorial DeskMarch 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे.

जळगाव। रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात होताच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे. यंदा गहू, हरभरा व मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असली, मात्र यंदा सर्वाधिक चर्चेत आहे ते ‘दादर’ पीक. कमी लागवड आणि वाढती मागणी यामुळे दादरला विक्रमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१६ मार्च रोजी बाजार समितीत दादरला शासनाच्या ₹३,४२१ हमीभावाच्या तुलनेत तब्बल ₹५,१०० प्रति क्विंटल दर मिळाला. म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे ₹२ हजारांनी अधिक भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी सुखावला आहे. यंदा दादरचे क्षेत्र कमी राहिल्याने बाजारात आवक मर्यादित आहे, पण मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरात जोरदार तेजी दिसून येत आहे. एका दिवसात सुमारे १७०० क्विंटल दादरची आवक झाली असून, वाढलेल्या भावामुळे बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, इतर पिकांचे दर तुलनेने स्थिर दिसत आहेत. हरभऱ्याला ४,८०० ते ५,००० रुपये दर मिळत असून, मेक्सिको हरभऱ्याला ८,६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सोयाबीनला सुमारे ₹५,३४५ तर गव्हाला ₹२,३५० दर मिळत आहे. बाजार समिती प्रशासनाच्या मते, गहू, हरभरा आणि मक्याची लागवड यंदा मोठ्या प्रमाणात झाली असली, तरी दादरचे क्षेत्र कमी राहिल्यानेच या पिकाला मागणी वाढून दरात मोठी उसळी आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add