Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरण उघड; ७ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरण उघड; ७ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले

Editorial DeskBy Editorial DeskMarch 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सात आरोपींना रंगेहात अटक केली

भुसावळ प्रतिनिधी :  वरणगाव ता भुसावळ पिंपळगाव खुर्द शिवारात विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सात आरोपींना रंगेहात अटक केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सोनल आपसिंग पावरा यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिनांक १९ मार्च २०२६ रोजी पहाटे सिनीयर टेक्निशियन विनोद प्रभाकर तायडे यांनी त्यांना फोनद्वारे पिंपळगाव खुर्द येथील शेतातील विद्युत डीपी (ट्रान्सफॉर्मर) चोरीस गेल्याची माहिती दिली.त्यानंतर सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संबंधित ठिकाणी महावितरण कंपनीचा ६३ केव्हीए क्षमतेचा ग्रे रंगाचा ट्रान्सफॉर्मर आढळून आला नाही. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत पिकअप वाहन (क्रमांक MH-19 CY 1971) मधून चोरी केलेला ट्रान्सफॉर्मर जप्त केला.

या प्रकरणात अर्जुन आत्माराम सोनवणे, रविंद्र अशोक भिल, धिरज रामदास जोहरे, आरबाजशहा अनवरशहा फकीर, गौरव कैलास इंगळे, शुभम सुनिल सोनवणे (सर्व रा. पिंपळगाव खुर्द, ता. भुसावळ) तसेच कामरानशहा महेमुदशहा फकीर (रा. आर्यन कॉलनी, भुसावळ) या सात जणांना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी रात्रीच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर खाली पाडून तो पिकअप वाहनात टाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटे साडेएक वाजता पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान ही घटना उघडकीस आली आणि आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
चोरीस गेलेल्या ट्रान्सफॉर्मरची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add