Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांकडून १६ ते १७ कोटीची रुपयाची फसवणूक.

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांकडून १६ ते १७ कोटीची रुपयाची फसवणूक.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 22, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

शेतकरी, शासन, आणि विमा कंपनीचा केला विश्वासघात.

यावल  प्रतिनिधी : यावल तालुक्यातील एकूण ८ सीएससी सेंटर चालकांनी शेतकऱ्यांची,शासनाची व विमा कंपनीचा विश्वासघात करून १६ ते १७ कोटी रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला तालुका कृषी अधिकारी यांनी दिल्याने तालुक्यातील एकूण ८ सी एस सी सेंटर केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकारणासह शेतकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी यावल पोलिसात
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यावल तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा आंबिया बहार योजनेअंतर्गत योजनांची अंमलबजावणी ही भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात येत आहे. तालुक्यात सन २०२५-२६ मध्ये केळी पिकासाठी प्राधान्याने फळपिका विम्यासाठी शेतकऱ्यांमार्फत सहभाग नोंदविला जातो. पिक विमा अर्ज पीक विमा पोर्टलद्वारे अर्जदार / शेतकरी ऑनलाइन सीएससी सेंटर,बँक किंवा स्वतः संबंधित पीक विमा कंपनीकडे सादर करीत असतात. सदर पीक विमा योजनेत प्रती हेक्टरी विमा हप्ता शेतकरी हिस्सा रुपये आठ हजार पाचशे, राज्याचा हिस्सा २८ हजार ५० रुपये, व केंद्राचा २१ हजार २५० रुपये आहे. असा एकूण रुपये ५७ हजार ८०० रुपये विमा हप्ता आहे. व विमा संरक्षित रक्कम रुपये १ लाख ७० हजार प्रति हेक्टर अशी आहे.
अर्जदार शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन ज्या क्षेत्रावर केळी पीक विमा काढायचा आहे त्याचा सातबारा उतारा गट क्रमांक सह आधार कार्ड, बँकेचे पासबुक, स्वतःचे घोषणापत्र,ज्या क्षेत्रावर केळीची लागवड केलेली आहे त्या क्षेत्राचा जिओ टॅग फोटो विमा हप्त्याची पावती त्याचप्रमाणे भाडे तत्त्वावर किंवा कुळाने असलेल्या शेतकऱ्याचा करारनामा सहमती पत्र शासन निर्णयानुसार सीएससी सेंटर जन सुविधा केंद्र यांची जबाबदारी व कर्तव्य आहेत.

राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर भरण्यात आलेली शेतकऱ्यांची माहिती व सादर केलेले कागदपत्रे यामध्ये तुमची व चुका आढळून आल्यास संबंधित सीएससी सेवा केंद्र जबाबदार असेल व अशा चुकांमुळे देय पीक विमा दाव्यांना जबाबदार राहील. भीमा सहभाग नोंदविलेले शेतकरी काही चुकात छोटी अथवा विपरीत बाबीमुळे योजनेच्या फायद्यापासून वंचित राहणार नाही याची जन सुविधा केंद्रावरील गाव पातळी सेवक ( VLE ) याची खात्री करणे VLE यांच्या सेवेतील त्रुटी, गैरव्यवहार यामुळे योजनेच्या फायद्यापासून शेतकरी वंचित राहिल्यास त्याचा अहवाल सादर करून त्यांच्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाते.

इत्यादी कारणावरून तालुक्यातील यावल येथील जयवंत राजेंद्र माळी, बापू निंबा पाटील,सुदर्शन अभिमन्यू पाटील ( दहिगाव )
विजय निंबा बाविस्कर ( साकळी ) , शुभम राजेंद्र तावडे ( निमगाव ), विठ्ठल गोरख पाटील ( मनवेल), तुषार चंद्रकांत पिंपळे ( भालोद ), दीपक गोविंदा महाजन ( मोहराळा ), या एकूण आठ सीएससी केंद्र चालकांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर ८० / २०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहे. सीएससी केंद्र चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यातील राजकारणात शेतकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add