Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती सिलिंडरचा गैरवापर उघड; १९ सिलिंडर जप्त

ताज्या बातम्या

युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती सिलिंडरचा गैरवापर उघड; १९ सिलिंडर जप्त

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले

जळगाव । युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून दुसरीकडे नंबर लावल्यावरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले असून अशातच घरगुती वापराच्या सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून धाडसत्र राबविले जात आहे.

गेल्या आठवडाभरात २८१ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर घरगुती १९ सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने १८ हजार १३४ रुपये किमतीचे सिलिंडर जप्त केले आहेत. काळाबाजार घरगुती गॅसचा रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथके नेमण्यात आली. ठिकठिकाणी महसूल विभाग छापेमारी करत आहे. यात छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईत घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दि. १३ मार्चपासून गॅस कंपन्यांकडून उपलब्ध साठ्याचा दैनंदिन अहवालदेखील घेतला आहे. त्यानुसार तीनही गॅस सिलिंडर वितरक कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलिंडरची मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम गृहिणींच्या दैनंदिन स्वयंपाक व्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर झपाट्याने वाढला आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल, खानावळी आणि लहान व्यावसायिकांनीदेखील इंडक्शन वापराकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, वीजबिलाचा फटका बसत असताना ‘एलपीजी’ एजन्सीधारकांकडे सातत्याने विचारणा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add