Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

ताज्या बातम्या

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

जळगाव । पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विजय भिमा राठोड असं मयत तरुणाचे नाव आहे. तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव असं अटक केलेल्या पती,पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहेत घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय राठोड याने आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती तिच्या पती संजय जाधव याला मिळाल्यानंतर दोघांमध्ये संताप निर्माण झाला. याच कारणावरून विजयचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी विजयवर हल्ला करून त्याची हत्या केली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. विजय काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. तपासादरम्यान संशयाची सुई संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली यांच्याकडे वळल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add