Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»अकोल्याच्या नीता वायकोळे यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’ प्रदान

जळगाव

अकोल्याच्या नीता वायकोळे यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’ प्रदान

Editorial DeskBy Editorial DeskApril 29, 2026Updated:April 29, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​अकोला प्रतिक्रिया | येथील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या नीता यशवंत वायकोळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल अत्यंत मानाचा ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात २७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

​डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान, भारत सरकारचा नीती आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय (MSME) संलग्न राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे आणि खादी व ग्रामोद्योग मंत्री रविंद्र साठे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

​सौ. नीता वायकोळे या महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या विदर्भ विभाग महिला उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि रॉबिन हूड आर्मी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून त्या अहोरात्र समाजसेवा करत आहेत. प्रामुख्याने अनाथ मुलांचे शिक्षण, अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे ठरले आहे. मुळच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील असलेल्या सौ. वायकोळे या भुसावळ येथील सकल लेवा महिला मंडळाच्याही सदस्य आहेत.

​पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी भावना व्यक्त केल्या की, “हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे पती यशवंत वायकोळे, मुलगा कुशल, मुलगी राजश्री आणि संपूर्ण कुटुंबियांच्या पाठिंब्याचा हा परिणाम आहे.” तसेच त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विशाल कोरडे आणि रॉबिन हूड आर्मी अकोला टीमचे विशेष आभार मानले. भविष्यातही निस्वार्थ भावनेने समाजसेवा करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

​या बहुमानाबद्दल अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add