Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मुख्याध्यापकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; जातीवाचक शिवीगाळ करून दिली धमकी

क्राईम

मुख्याध्यापकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; जातीवाचक शिवीगाळ करून दिली धमकी

Editorial DeskBy Editorial DeskMay 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील एका गावातील माध्यमिक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक संजय पंडीतराव शंखपाळ यांनी एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून तिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय पीडित महिला या शाळेत कार्यरत आहेत. शाळेतील सर्व कामे वेळेवर पूर्ण करूनही मुख्याध्यापक संजय शंखपाळ हे त्यांना वारंवार विनाकारण मानसिक त्रास देत होते. “तुझे काम अपूर्ण आहे” असे खोटे आरोप लावून चेअरमनकडे तक्रार करण्याची आणि लांब बदली करण्याची धमकी ते देत असत. ३० एप्रिल  रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार पुन्हा घडला.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापकाने तिला लज्जा वाटेल असे अश्लील शब्द वापरले. इतकेच नव्हे तर, “तू खालच्या जातीची स्त्री आहेस, तुझी नोकरी कशी राहते तेच मी पाहतो” असे म्हणून जातीवरून अपमानित केले. समाजात आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन अश्लील हावभाव करत शिवीगाळ केली. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली.

चोपडा शहर पोलिसांनी याप्रकरणी मुख्याध्यापक संजय पंडीतराव शंखपाळ (रा. चहार्डी, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक धर्मेंद्र विलास ठाकूर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add