Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल सातपुडा पर्वतरांगांत वणवा लावताना तरुणाला रंगेहाथ पकडले ; यावल वनविभागाची कारवाई

ताज्या बातम्या

यावल सातपुडा पर्वतरांगांत वणवा लावताना तरुणाला रंगेहाथ पकडले ; यावल वनविभागाची कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskMarch 18, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली

जळगाव । यावल वनविभागाच्या पथकाने सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली आहे. झेंडी, यावल येथील रहिवासी राज्या सखाराम बारेला हा वाघझिरामधील कक्ष क्रमांक १४९ मध्ये प्रत्यक्ष वणवा लावत असताना वन पथकाने ताब्यात घेतला.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सातपुडा परिसरातील वाघझिरा राऊंड अंतर्गत परिमंडळ वाघझिरा, नियतक्षेत्र मनुदेवी कक्ष क्रमांक १४९ येथे तपासणी केली. या वेळी विविध ठिकाणी वन-वणवा लावलेला आढळून आला. पथक घटनास्थळी पोहोचले असता आरोपी राज्या सखाराम बारेला हा प्रत्यक्ष वणवा लावताना दिसून आला.

त्याला न्यायालयाने १८ मार्च २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. पथकाने तत्काळ जंगलात लागलेला वणवा विझवून मोठा अनर्थ टाळला.ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिमंडळ अधिकारी विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, अशोक राठोड, रतन शेलार, जगदीश बारेला आणि इतर वनसेवकांच्या तत्परतेमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान टळले.सातपुडा परिसरातील वाढत्या तापमानामुळे वणव्याचा धोका वाढलेला आहे. यावरून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा घटनांची तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add