Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शिवसेना उबाठा गट डोळ्याला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून जिल्हाधिकारी कार्यालसासमोर अनोखे आंदोलन !

जळगाव

शिवसेना उबाठा गट डोळ्याला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून जिल्हाधिकारी कार्यालसासमोर अनोखे आंदोलन !

Editorial DeskBy Editorial DeskMarch 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

गॅस सिलिंडरचा तुटवडा व महागाई यावर शिवसेना शिवसेना उबाठा गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

गॅस सिलिंडरचा तुटवडा व महागाई यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेना गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी डोळ्याला अन तोंडावर काळी पट्टी बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले. गॅस तुटवडा आणि वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

गॅस बुकिंगनंतर लागणारा कालावधी कमी करावा. गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत सिलिंडर घरपोच मिळणे बंधनकारक करावे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे व शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांनी केली आहे. यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गॅस ग्राहकांसाठी मोठा दिलासा दिला असून ९६ तासाचा तसाच नियम येथे लागू करावा, गॅस सिलिंडर दरवाढ तसेच अघोषित तुटवडा तत्काळ दूर करण्यासाठी उपाय योजना कराव्यात.युद्धामुळे भारतात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून दर वाढले आहे. महाराष्ट्र सरकारने जळगांव जिल्ह्यातील तसेच राज्यातिला इतर भागातील गॅस सिलिंडर टंचाई दूर करावी व साठेबाजी रोखण्यासाठी प्रयत्न करावा.

गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करून दरवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करणार येईल, असा इशारा देण्यात आला.यावेळी जळगांव ग्रामीणचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह शिवसेना जळगांव तालुका प्रमुख प्रमोद घुगे, योगेश चौधरी, प्रेमराज राठोड, योगेश पाटील डॉ.रमाकांत कदम,भगवान धनगर, किरण ठाकूर, भीमराव पांडव, प्रमोद सोनवणे, प्रसाद पाटील,सचिन चौधरी, प्रदीप पाटील, अशोक पाटील, रामदास कोळी, खुशाल अहिरे, महेश अहिरे, शांताराम उशिर आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add