Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रासायनिक साठ्यावर पोलिसांचा छापा; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम

रासायनिक साठ्यावर पोलिसांचा छापा; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Editorial DeskBy Editorial DeskMay 13, 2026Updated:May 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शहरात मोठी कारवाई करण्यात आली असून, राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे शिवार परिसरात सुरू असलेल्या घातक रासायनिक पदार्थांच्या अवैध साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या धाडीत पोलिसांनी तब्बल ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, म्हसवे शिवारातील रामदेव राजस्थानी चौधरी हॉटेलच्या मागील बाजूस दिनेश पोपटराव पाटील (वय ४३) हा इसम ‘सोडियम बाय सल्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठा करत आहे. हे रसायन काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच या साठ्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

माहितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी पारोळा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ११ मे रोजी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी आरोपी दिनेश पाटील हा मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त साठ्यासह पोलिसांच्या हाती लागला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी टाटा कंपनीचा १२ चाकी टँकर, अंदाजे ३८ हजार ७५० लिटर रसायनयुक्त पदार्थ, १५ हजार लिटर क्षमतेचा जमिनीवरील टँकर, मोटारसायकल, मोबाईल फोन तसेच रसायनांच्या टाक्या असा एकूण ९.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add