Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»गेंदालाल मिल परिसरातील भंगार दुकानाला भीषण आग !

क्राईम

गेंदालाल मिल परिसरातील भंगार दुकानाला भीषण आग !

Editorial DeskBy Editorial DeskMay 11, 2026Updated:May 11, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका भंगार दुकानाला आज, सोमवारी (११ मे) सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. भरवस्तीत असलेल्या या दुकानातील आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून शेजारील फर्निचर दुकान थोडक्यात बचावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरातील भोंग्याजवळ महानगरपालिकेचे मार्केट आहे. या मार्केटमधील दुकान क्रमांक ८७ हे निसार खान यांच्या मालकीचे असून त्यात भंगाराचा व्यवसाय केला जातो. सोमवारी सकाळी या दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रभारी मुख्य अग्निशमन अधीक्षक अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक युसुफ पटेल, फायरमन सौरभ चित्ते, विठ्ठल पाटील, तेजस बडगुजर, पन्नालाल सोनवणे, अनिल गायकवाड, गौरव पाटील आणि विशाल पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या कार्यात स्थानिक नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले.

अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे या दुकानाच्या अगदी लागून असलेले फर्निचरचे दुकान आगीच्या विळख्यात येण्यापासून वाचले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, मात्र भंगार दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add