Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे आयुक्तांकडे सादर करण्यात आली

ताज्या बातम्या

स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे आयुक्तांकडे सादर करण्यात आली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 26, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव महापालिकेत ‘या’ सात जणांना स्वीकृत सदस्यपदाची संधी

जळगाव महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहेत. येत्या सोमवार, ३० मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेत या सदस्यांची अधिकृत घोषणा होणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे आज बुधवारी (दि.२५) भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी सुपूर्द करण्यात आली. भाजपच्या वतीने डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे यांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत.दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे वेगवेगळ्या स्तरावरून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित साळुंखे यांचे नाव सुचविले असून, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शरद तायडे यांचा प्रस्ताव मांडला आहे. हा हा प्रस्ताव बाळासाहेब कंखरे, उमेश चौधरी यांनी आयुक्तांकडे सादर केला. त्यामुळे या गटात अंतिम निवडीबाबत चर्चेला उधाण आले आहे.

प्राप्त प्रस्तावांची छाननी येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी आयुक्तांच्या दालनात करण्यात येणार आहे. या छाननी प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची यादी निश्चित होऊन अंतिम निर्णयासाठी विशेष सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

आज प्रस्ताव सादर करताना भाजप व शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

यामध्ये गटप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, दिलीप पोकळे, सागर सोनवणे, भाजपचे दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि गटनेते प्रकाश बलाणी यांचा समावेश होता. या उपस्थितीतून आगामी निवड प्रक्रियेचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले.स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, विविध पक्षांनी आपापले बळकटीकरण करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे ३० मार्च रोजी होणाऱ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add