Author: Editorial Desk

गैरसोय लक्षात घेता केंद्र सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जळगाव । देशात एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता केंद्र सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आखाती देशांतून नैसर्गिक वायू घेऊन आलेली जहाजे भारतीय किनाऱ्यावर पोहोचली असून, पुढील दोन महिन्यांसाठी पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा आहे. दरम्यान, गॅस वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने बुकिंग प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, एका ग्राहकाला महिन्यात जास्तीत जास्त दोनच घरगुती सिलेंडर बुक करता येणार आहेत. तसेच दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले…

Read More

जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी आता नव्या १९०४७/४८ या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. याबाबतची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. विशेष गाडी असल्यामुळे प्रवाशांना आतापर्यंत अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मात्र, आता नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असून सामान्य प्रवाशांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच…

Read More

जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार वादळ, पावसासह गारपिटीचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. यंदा मार्च मध्ये हवामानात अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. एकीकडे मार्चमध्येच उष्णतेच्या तीव्रतेनं अंगाची लाहीलाही होत असताना त्यातच अवकाळी पावसाचे सावटही घोंगावत आहे. जळगावचे तापमान ४० अंशावर पोहोचल्याने उष्णतेचा तडाखा जळगावकरांना जाणवत आहे. दिवसासह रात्रीच्या उकाड्यातही…

Read More

आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली बोदवड : भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन गैरप्रकाराने खरेदी करून फसवणूक करण्यासह अनुसुचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या संदर्भातील माहिती अशी की, २००२ साली भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमीनी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली विकत घेण्यात आल्या होत्या. यात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना तायडे कुटुंबाला…

Read More

सदर बैठकी ला संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते.अनिस शेख पत्रकार यांच्या अध्यक्षते खाली. सदर बैठकी ला संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते.अनिस शेख पत्रकार यांच्या अध्यक्षते खाली. व अपंग जनता दल. सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यश यांच्या नैतृत्वाखाली घेण्यात आली.सदर बैठकीत संस्थापक अध्यक्ष शेख अनिस पत्रकार राज्य अध्यक्ष जाकीर शेख,यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, राज्य सम्पर्क प्रमुख लक्ष्मण राज्य उपाध्यक्ष कुणाल झाल्टे, राज्य उपाध्यक्ष गणेश मगर,जालना जिल्हाध्यक्ष नूर चौधरी, वाघे, राज्य महिला अध्यक्षा मीनाताई धोत्रे, राज्य महिला उपाध्यक्ष सरला लुले.यांनी सर्वानी आ प आपले विचार व्यक्त केले तसेच संघटनेत काम करणारे व इच्छुक असलेले नवनियुक्त पदाधिकारी पण…

Read More

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील जुनोने शिवारात गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले. ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, जुनोने येथील कुंडाच्या नाल्यात रूखमाबाई रतन मोरे यांच्या शेताजवळ एका इसमाकडून बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईत दगडू सदाशिव गायकवाड (वय 50, रा. जुनोने, ता. चाळीसगाव) यास जागीच पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून सुमारे 350 लिटर कच्चे रसायन (गुळ, नवसागर, एरंडी मिश्रित) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे 12,250 रुपये…

Read More

शिवापुर तांड्यात दांपत्याचा संशयास्पद मृत्यू चाळीसगावात खळबळ चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पोपट जाधव (वय 38) व त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय 27, दोघेही रा. शिवापुर तांडा, ता. चाळीसगाव) यांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 28 मार्च रोजी सकाळी 9.45 वाजण्यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे.दोघांचाही मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणे अनुक्रमे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 19/2026 व…

Read More

गॅस एजन्सी वर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांना रयत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे, चाळीसगाव प्रतिनिधी : सद्यस्थितीत युद्ध परिस्थिती असल्याने चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडर साठी गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत तरी देखील ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर देण्यासह घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून सिलिंडर काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी वर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांना रयत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे, शहरातील काही एजन्सी चालक गॅस सिलिंडर ची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे तसेच मोबाईल वर बुकिंग करून देखील गॅस सिलिंडर दिले जात नाही.…

Read More

आय क्यू एअर स्विसच्या हवा गुणवत्ता अहवालात चिंता जळगाव : दिवसेंदिवस प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून जळगावकरांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात जळगावकरांना अतिसूक्ष्म धूलिकणांचा धोका वाढला असून यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आय क्यू एअर या स्विस कंपनीने सादर केलेल्या सन 2025 च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालामध्ये जळगावचे नाव अग्रक्रमावर आले आहे. महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव आणि बेलापूरसारख्या शहरातील पीएम 2.5 (अतिसूक्ष्म धूलिकण)चे प्रमाण धोकादायक असल्याचे हा अहवाल सांगतो. पर्यावरण आणि आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या अतिसूक्ष्म धूलिकणांचा (पीएम 2.5) जळगावात प्रसार वाढता आहे. शहरासह जिल्हाभरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर उपाययोजना मात्र शून्य…

Read More

सातत्याने महिलांना तिथे पाठवणे भयानक गोष्ट! खरात- चाकणकर कनेक्शनवर रुपाली ठोंबरे आक्रमक “मूळामध्ये खरात ज्याच्यात आरोपी आहे. तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास एसआयटीकडे गेलेला आहे. झाशीची राणी प्रतिष्ठानच्यावतीने मी मागणी केलेली आहे की, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष यांना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांचा सातत्याने शिर्डी, आर्वीत खरातने इतरांवर जो गुन्हा दाखल केलेला. तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टाकला होता” असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. “सातत्याने महिलांना तिथे पाठवणे एवढी भयानक गोष्ट आहे. राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडित महिलांचं समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील…

Read More