Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»रेल्वे स्थानकावर पठाणकोट एक्स्प्रेसमधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

रेल्वे स्थानकावर पठाणकोट एक्स्प्रेसमधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला

जळगाव । भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी बऱ्हाणपूर येथील एका संशयिताला अटक करण्यात आली. सुनील शिवनारायण मालाकार (वय ४२, शिवाजीनगर, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, अप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा भुसावळहून मनमाड-मुंबईदरम्यान तस्करीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांना सतर्क करून संयुक्त पथक तयार करण्यात आले. दि. २३ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आल्यानंतर इंजिनाजवळील सर्वसाधारण डब्याची झडती घेण्यात आली. यावेळी १७ संशयास्पद बॅगा आढळून आल्याने त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळला.

डब्यातील प्रवाशांकडून चौकशी केल्यानंतर संबंधित बॅगा सुनील शिवनारायण मालाकार याच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. जप्त केलेल्या १७ बॅगांमध्ये विविध प्रकारचा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.हवालदार महेश धनराज पराते यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाच्या तपासातून गुटखा तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add