Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जिल्ह्यात कृषी विभागाची धडक कारवाई;

ताज्या बातम्या

जिल्ह्यात कृषी विभागाची धडक कारवाई;

Editorial DeskBy Editorial DeskMarch 25, 2026Updated:March 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

२ खत विक्रेत्यांचे परवाने कायमचे रद्द, १० निलंबित

जळगाव । जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि जास्त दराने विक्रीच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत २ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहे. त्यासोबत कासोदा (एरंडोल) येथील सोसायटीसह अन्य १० व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर एका परवानाधारकाला ताकीद दिली आहे.

अचानक तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी खताचा साठा नोंदीत नसणे, दरपत्रक न लावणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे अशा त्रुटी आढळून आल्या.या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने जळगाव जिल्ह्याच्या कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून सहा दुकानांत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नाही, असे सांगत जास्त दराने विक्री करून लूट केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले होते.

नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी कोणतीही गैरव्यवहाराची घटना आढळल्यास तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी युरिया व इतर खते खरेदी करताना आधार कार्ड सोबत न्यावे. आधार लिंक करूनच खरेदी करावी. किती व कोणती खते विक्री झाली, याची खात्री करावी. परवानाधारकांनीही रब्बी हंगाम संपत आला असला तरी खतांसह अन्य साठ्याची विक्री नियमानेच करावी. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add