Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»राज्यात प्रथम क्रमांक पटकावला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्या

राज्यात प्रथम क्रमांक पटकावला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे उल्लेखनीय कामगिरी

Editorial DeskBy Editorial DeskMarch 29, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

जळगाव । महाराष्ट्र् राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते. या मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यामध्ये संकेतस्थळाचे आधुनिकीकरण, ‘आपले सरकार’ पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, डिजिटल डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ jalgaon.gov.in हे अद्ययावत व नागरिकाभिमुख स्वरूपात विकसित करण्यात आले असून ते मोबाईलसह सर्व उपकरणांवर सुसंगत करण्यात आले आहे. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर १९ अधिसूचित सेवा पूर्णतः ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ज स्वीकृतीपासून सेवा वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘सेतूदूत जळगाव’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना २४x७ अर्ज स्थिती, तक्रार नोंदणी तसेच विविध योजनांची माहिती उपलब्ध होत आहे. तसेच जिल्हा स्तरावर विकसित करण्यात आलेला डिजिटल डॅशबोर्ड मुख्यमंत्री डॅशबोर्डशी एकात्मिक करण्यात आला असून विविध योजना व कार्यक्रमांची रिअल-टाइम माहिती उपलब्ध होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add