Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव गिरणा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन; प्रशासनावर दुर्लक्षाचे आरोप

ताज्या बातम्या

चाळीसगाव गिरणा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन; प्रशासनावर दुर्लक्षाचे आरोप

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

उत्खनन केलेली वाळू डंपरद्वारे चाळीसगाव-मालेगाव तसेच नाशिककडे विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील रहिपुरी व जामदा परिसरातील गिरणा नदीपात्रातून गेल्या महिनाभरापासून दिवसरात्र जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे. उत्खनन केलेली वाळू डंपरद्वारे चाळीसगाव-मालेगाव तसेच नाशिककडे विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

जिल्ह्यात इतरत्र वाळू तस्करांविरुद्ध कारवाई होत असताना चाळीसगाव तालुक्यात मात्र किरकोळ प्रकरणांवरच कारवाई होत असून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही वाळू तस्करांना पाठबळ असल्यामुळे स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक वाळू चोरी होत असल्याचे दिसून येत आहे.

रहिपुरी, जामदा, बहाळ, उपखेड, दसेगाव या गावांजवळील गिरणा नदीपात्रात सातत्याने उत्खनन सुरू असल्याचे सांगितले जाते. तसेच भडगाव येथून दररोज रात्री उशिरा वाळूने भरलेले डंपर चाळीसगाव शहरात येऊन थांबत असून, एजंटमार्फत सकाळपर्यंत त्याची विक्री व विल्हेवाट लावली जाते.दरम्यान, या प्रकारामुळे पर्यावरणीय हानीसह शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add