Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»अवकाळी पावसाचा महाराष्ट्रात पुन्हा मोठा इशारा; जिल्ह्यांना येलो अलर्ट

जळगाव

अवकाळी पावसाचा महाराष्ट्रात पुन्हा मोठा इशारा; जिल्ह्यांना येलो अलर्ट

Editorial DeskBy Editorial DeskMarch 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

उष्णतेचा तडाखा वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.

जळगाव  । महाराष्ट्रातील हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत असून एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर काल अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढले. दरम्यान, हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाबाबत मोठा इशारा दिला आहे. ३१ मार्च पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला असून शासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट?

आज पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add