Author: Editorial Desk

घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. जळगाव प्रतिनिधी । शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याशी थेट संबंध असलेल्या आव्हाणे शिवारातील घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत कचरा डेपोतील कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे दीर्घकाळ रखडली होती. शहरात उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही…

Read More

‘कलासंगम’ या बहुप्रतिक्षित सांस्कृतिक महोत्सवांचा दिमाखदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जळगाव प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित ‘कारवां-२०२६’ आणि ‘कलासंगम’ या बहुप्रतिक्षित सांस्कृतिक महोत्सवांचा दिमाखदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सात दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत कला, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. १९ ते २५ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. टी. वग्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी दीपक चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सुरुवातीपासूनच कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पहिल्या दिवशी Open Mic, Poetry, Fishpond आणि Dance या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर…

Read More

कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदीगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्टर 37 परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर सुमारे साडे चारच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की तो दूरपर्यंत ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटामुळे कार्यालयाबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात…

Read More

जळगावकरांनो सावध रहा! जिल्ह्यात पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जळगाव : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच पावसामुळे नागरिकांना उन्हाळा आणि पावसाचा दुहेरी अनुभव येत आहे. दरम्यान, हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून ३ आणि ४ एप्रिल रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून…

Read More

याविरोधात लवकरच मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती संतोष सोनवणे यांनी दिली आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने वीज निर्मितीत नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असले तरी प्रदूषण नियंत्रणाकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. केंद्रातील 210 मेगावॅट, 2×500 मेगावॅट आणि 1×660 मेगावॅट असे तीनही प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. मात्र, कोळशापासून निर्माण होणारी राख योग्य पद्धतीने व्यवस्थापित न करता पाईपलाईनद्वारे वेल्हाळे परिसरातील राख साठवण बंधाऱ्यात सोडली जाते. या राखेची पाईपलाईन वारंवार फुटणे तसेच राख साठवण बंधाऱ्यातून निचऱ्याच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडून भवानी नदीमार्गे वेल्हाळे तलावात मिसळत असल्याने गंभीर जलप्रदूषण निर्माण झाले आहे.वेल्हाळे तलावावर…

Read More

चाळीसगाव नगरपरिषद मुख्यद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. दुपारी १२ ते २.३० या वेळेत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील घाट रोड, नारद चौफुली येथे संत सेवालाल महाराज चौक उभारणीच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाने बुधवार (दि. १ एप्रिल २०२६) रोजी चाळीसगाव नगरपरिषद मुख्यद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. दुपारी १२ ते २.३० या वेळेत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संत सेवालाल महाराजांचे चौक/स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात १९ सप्टेंबर २००४ रोजी आंदोलन व उपोषण करण्यात…

Read More

सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंना “खेलो इंडिया” नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश ! भुसावळ प्रतिनिधी : शहरातील सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंनी चेन्नई येथे ३० मार्च रोजी झालेल्या खेलो इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करून शहराचे नाव लौकिक केले आहे. किक बाॅक्सिंग स्पर्धेत आरुषी सावकारे हिने सिल्वर मेडल तर ममता कंवर हिने ब्रांझ मेडल पटकावले आहे.सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन चे प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ सुमेध शेजवळ व राकेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली किक बाॅक्सिंग ज्युडो कराटे आदी प्रशिक्षण मुलामुलींना दिले जात आहे. भिमज्योत शेजवळ हे गेल्या ३८ वर्षापासून विनामूल्य मुलामुलींना किक बाॅक्सिंगचे प्रशिक्षण देत आहेत. चेन्नई येथे नुकत्याच…

Read More

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असल्याचे शिक्षण विभागाच्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आल्याने निकाल प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि इतर वर्गांचे शैक्षणिक नियोजन सुरळीत पार पडावे, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात नव्या शैक्षणिक सत्राची तयारी मार्च महिन्यापासूनच सुरू करण्यात…

Read More

युद्ध भडकलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा कठोर इशारा, म्हणाले… जळगाव । पश्चिम-आशियातील सुरू असलेल्या युद्धाचा भारतासह अनेक देशांना फटका बसत आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपणार याकडे अख्या जगाचं लक्ष लागून आहे. मात्र या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. करारासाठी इराणने सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्या सर्व वीज निर्मिती प्रकल्पांवर एकाच वेळी मोठा हल्ला केला जाईल, अशी स्पष्ट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. गुरुवारी अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना ट्रम्प यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ही मोहीम अजून सुरू असून पुढील दोन…

Read More

जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव । जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात काही व्यक्ती कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नियोजन करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळून आली.…

Read More