Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले !

क्राईम

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले !

Editorial DeskBy Editorial DeskMay 25, 2026Updated:May 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | एसटी बसस्थानकांवरील वाढत्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचा धक्कादायक प्रत्यय जळगाव शहरात आला आहे. नवीन बसस्थानक परिसरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने अत्यंत चाणाक्षपणे आणि शिताफीने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रमन कौतीक पाटील (वय ७०, रा. वर्डी, ता. चोपडा) हे आपल्या पत्नी यमुनाबाई रमन पाटील यांच्यासह काही वैयक्तिक कामानिमित्त जळगाव शहरात आले होते. काम आटोपून परत जाण्यासाठी २२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील नवीन बसस्थानकावर आले. उन्हाळ्याचे दिवस आणि लग्नसराईमुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच तुडुंब गर्दीचा गैरफायदा घेत एका अज्ञात चोरट्याने यमुनाबाई पाटील यांच्या गळ्यातील अंदाजे १० ते १२ वर्षांपूर्वी घेतलेली, ९ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी, मंगळसूत्र आणि सोन्याचे पदक असलेली पोत अतिशय शिताफीने ओरबाडून नेली.

​बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर गळ्याला हात लावला असता सोन्याची पोत गायब झाल्याचे यमुनाबाई यांच्या लक्षात आले. हा प्रकार समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पतीसह बसस्थानक आणि परिसरात बराच शोध घेतला; परंतु चोरटा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता. अखेर कोणतीही सुगावा न लागल्याने त्यांनी पतीसह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

या चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची जुनी अंदाजे किंमत ३० हजार रुपये इतकी असून, पोलीस आता बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add