प्रांत कार्यालयापासून काही कि.मी.अंतरावर असलेल्या दसनूर भुसावळ प्रतिनिधी :फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय कार्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेर तालुक्यातील दसनूर,निंभोरा परिसरात गौण खनिज अवैधरित्या उत्खनन करून बिना परवाना सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याने फैजपूर प्रांताधिकारी यांनी व रावेर तहसीलदार यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रातील दसनूर नदीपात्रातून आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अवैध वाळू व मातीचे उत्खनन सुरू असून, त्याची वाहतूक देखील राजेरोस,सर्रास पणे केली जात आहे.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार गैरप्रकार सक्रिय सिंडीकेटमार्फत अनेक दिवसांपासून चालू असून, त्यामुळे पर्यावरणात्या हानीसोबतच सरकारी मालमत्तेची चोरी दररोज मोठ्या प्रमाणात होत असून शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी सुद्धा बुडवली जात आहे.…
Author: Editorial Desk
विकासासाठी रस्त्यावर उतरले भुसावळकर; जनआक्रोश मोर्चा गाजला ! भुसावळ प्रतिनिधी :भुसावळ शहरातील विविध प्रलंबित विकासकामांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता “भुसावळ जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. गांधी पुतळा, यावल नाका येथून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला असून प्रांत अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीं नायक सहसिलदार संतोष विनंते यांना निवेदन सादर करण्यात आले. “ना राजकारणासाठी, ना स्वार्थासाठी; हा लढा फक्त भुसावळच्या विकासासाठी” या भूमिकेतून मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शहरातील स्मशानभूमी, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, दिव्यांग कल्याण, घरकुल योजना, स्वच्छता, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांबाबत वारंवार अडथळे येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मोर्चाद्वारे २५ हून अधिक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये स्मशानभूमी…
सुनेत्रा पवारांची उमेदवारी बिनविरोध होईल का? बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यापैकी बारामती येथील निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला अजित पवार यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांनी आपला अर्ज दाखल केला. ही निवडणूक अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत आहे. त्यामुळे हा भावनिक प्रश्न असून निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वत्र मागणी होत आहे. तथापि येथे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस हाय कमांडने घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसला रासप आणि वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या तरी काँग्रेस पक्षातर्फे मोरे नावाची व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.…
नगराध्यक्ष सुनील काळेंची मंत्री सावकारेंवर नाराजी! नगरपालिका निवडणुकीपासून वरणगावचे नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार सुनील काळे हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे विरोधात षड्डू ठोकून उभे होते. सुनील काळे यांनी भाजपची उमेदवारी नाकारण्यात संजय सावकारे यांचा हात होता. त्यांनी सुनील काळे यांना भाजपची उमेदवारी मिळू दिली नाही, असा आरोप काळे यांनी वारंवार केला. तरीपण सुनील काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अपक्ष म्हणून दणदणीत विजय मिळवला. निवडून आल्यानंतर काळे यांनी “मी भाजपचाच उमेदवार आहे, माझी उमेदवारी गिरीश महाजन यांना अर्पण करत आहे,” असे जाहीरपणे सांगितले. नगराध्यक्ष म्हणून सुनील काळे निवडून आल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी फोन करून ‘आमच्या पक्षात या…
स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. जळगाव । स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. पोलिसांच्या या कारवाईत चोरीस गेलेल्या २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने चोरट्यांमध्ये खळबळ उडाली. याबाबत असे की, दिनांक ०६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली की, इराणी मोहल्ला भागातील रजा टॉवर परिसरात काही संशयास्पद दुचाकी उभ्या आहेत. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खातरजमा केली…
२४ हजार शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी कृषी विभाग मोठे पाऊल जळगाव । जळगाव जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस केळी पीकविमा प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून खुलासे न सादर करणाऱ्या तब्बल २४ हजार शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी कृषी विभाग मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लागवड नसतानाही विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत जिल्ह्यात सुमारे ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर कागदोपत्री केळी बागा दाखवण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात २७ हजारांहून अधिक शेतकरी आणि ४८ सीएससी केंद्र चालकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शासनाची फसवणूक करण्यासाठी संगनमताने हा प्रकार घडल्याचा ठपका कृषी…
पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी ; आमदार राजूमामा भोळे जळगाव । जळगाव जिल्हा महानगर भाजपाच्या वतीने पक्ष स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बळीराम पेठ येथील जी.एम. फाउंडेशन आणि जुने भाजप कार्यालय येथे पक्ष ध्वजवंदन व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ८.३० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी पक्षाच्या दिवंगत कार्यकर्त्यांसह ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमात भाजपाच्या ४६ ज्येष्ठ व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्मृतिचिन्ह भाजपाचा गमच्या व तांब्याचा दिवा असे सन्मानाचे स्वरूप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाच्या…
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी भेट शनिवारी (दि. ४) भेट दिली व विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. गोरेगाव येथे ‘इकॅमेक्स-२०२६’चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले. विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री श्री.…
सहकारी संस्थांना कोट्यावधी रुपये थकित गोदाम भाडे मिळणार केव्हा..? यावल प्रतिनिधी : तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात शासनाच्या वतीने भरड धान्य खरेदी केले जाते,आणि भरड धान्य खरेदी केले होते आणि आहे हे धान्य साठविण्यासाठी यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे विविध कार्यकारी सोसायट्या,फ्रुटसेल्स सोसायटी, शेतकरी सहकारी संघाचे व इतर काही संस्थांचे गोदाम शासनाच्या तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत भाड्याने घेतले होते आणि आहेत या सर्व गोदामांचे कोट्यावधी रुपये भाडे काही वर्षापासून थकीत झाल्याने अनेक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. आणि या सहकारी संस्थांमध्ये खास करून सर्वच लोकप्रतिनिधींचे कट्टर समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते पदाधिकारी असताना याकडे मात्र सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधीचे आणि…
अपघातानंतर चोरट्यांनी वाहन जागेवरच सोडून पळ काढल्याचे उघड झाले आहे. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील जामडी शिवारात शेतातून चोरलेली चारचाकी कार पळवून नेत असताना नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर चोरट्यांनी वाहन जागेवरच सोडून पळ काढल्याचे उघड झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जामडी येथील शेतकरी इंदल परदेशी यांनी आपली एमएच ४० एआर २९४० क्रमांकाची कार शेतातील घराजवळ उभी केली होती. दरम्यान, सकाळी शेतात गेल्यानंतर कार जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता नागद शिवारातील सायगव्हाण रस्त्यावर बाभळीच्या झाडाला धडकून कार उलटलेल्या अवस्थेत आढळून आली.प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कार चोरून भरधाव वेगाने पळ काढला. मात्र, वेगावर नियंत्रण…

