Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी,जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष.

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी,जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष.

Editorial DeskBy Editorial DeskApril 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

सहकारी संस्थांना कोट्यावधी रुपये थकित गोदाम भाडे मिळणार केव्हा..?

यावल प्रतिनिधी : तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात शासनाच्या वतीने भरड धान्य खरेदी केले जाते,आणि भरड धान्य खरेदी केले होते आणि आहे हे धान्य साठविण्यासाठी यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे विविध कार्यकारी सोसायट्या,फ्रुटसेल्स सोसायटी, शेतकरी सहकारी संघाचे व इतर काही संस्थांचे गोदाम शासनाच्या तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत भाड्याने घेतले होते आणि आहेत या सर्व गोदामांचे कोट्यावधी रुपये भाडे काही वर्षापासून थकीत झाल्याने अनेक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

आणि या सहकारी संस्थांमध्ये खास करून सर्वच लोकप्रतिनिधींचे कट्टर समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते पदाधिकारी असताना याकडे मात्र सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधीचे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.


जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून माहिती सुद्धा दिली जात नसल्याचे उघड झाले — ते पुढील प्रमाणे दि.२४ मे २०२५ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा सन २००५ अन्वये माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा अव्वल कारकून,प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी माहिती अवलोकनाच्या नावाखाली ( मागितलेली माहिती अवलोकनाची मागणी नसताना ) माहिती दिलेली नाही.शासनाच्या वतीने भरड धान्य खरेदी केले आहे आणि त्याबाबत वरील कालावधीत यावल तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी,शेतकरी सहकारी संघाचे व इतर काही संस्थांचे गोदाम ( जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ) भाड्याने घेतलेले आहे.

या सर्व संस्थांचे गोदाम भाड्याची रक्कम शासनाकडे आपल्या कार्यालया कडे घेणे बाकी आहे. यावल तालुक्यातील त्या संस्थांचे नाव,जी रक्कम बाकी आहे ती रक्कम, वर्ष निहाय तारखेसह सविस्तर माहिती तसेच शासनाकडून बाकी मिळण्यासाठी आणि संस्थांनी आपल्याकडे बाकी मिळण्यासाठी पत्र दिले आहे त्या सर्व पत्रांच्या छायांकित प्रती आरटीआय लोगसह माहिती मागितली असता जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून माहिती अवलोकन करून घ्या असा अट्टहास,हेकेखोरपणा दाखवून माहिती घेण्यास टाळाटाळ केली आहे.


तरी जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांना जाब विचारत सहकारी संस्थांना थकित गोदामभाडे त्वरित मिळवून देण्याबाबत कार्यवाही करावी अशी यावल तालुक्यात सह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून मागणी होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add