Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»उद्घाटनानंतरही किनगाव ग्रामीण रुग्णालय बंद ; कर्मचारी टंचाईमुळे सेवा ठप्प

ताज्या बातम्या

उद्घाटनानंतरही किनगाव ग्रामीण रुग्णालय बंद ; कर्मचारी टंचाईमुळे सेवा ठप्प

Editorial DeskBy Editorial DeskApril 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

उद्घाटन होऊनही अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2024 मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन होऊनही अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यामागे मोठ्या प्रमाणातील कर्मचारी टंचाई हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.

या रुग्णालयात लिपिक, सहाय्यक अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी तसेच इतर आवश्यक कर्मचारी पदे रिक्त असल्याने संपूर्ण आरोग्य सेवा सुरू होऊ शकलेली नाही व त्यामुळे स्थानिक नागरिकांना अद्यापही उपचारासाठी इतरत्र जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा रुग्णालय जळगाव येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील वि. सानप यांनी नाशिक मंडळाच्या उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना पत्र पाठवून तात्काळ पदभरती करण्याची मागणी केली असून रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून देण्याचाही पर्याय सुचविण्यात आला आहे.

दरम्यान, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांनीही या प्रश्नावर पुढाकार घेत प्रशासनाचे लक्ष वेधले असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्घाटन होऊनही रुग्णालय सुरू न होण्यामागील प्रशासनिक विलंब व कर्मचारी अभाव यावर आता त्वरित निर्णय होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add