Author: Editorial Desk

यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला आहे. यावल प्रतिनिधी : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला आहे. सदर सोहळा हा दिनांक १५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. यानिमित्ताने गुरुचरित्र पारायण साठी मोठ्या संख्येत भाविक, भक्तांची येथे दररोज आता उपस्थितीत लाभणार आहे.पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. शहरात भुसावळ रस्त्यालगत श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुवार पासून अखंड नाम यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजता औदुंबर प्रतीक्षणा, ८ वाजता भूपाळी,…

Read More

या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा चाळीसगाव प्रतिनिधी : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हटिया तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले असून चाळीसगावकरांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना या गाड्यांचा थेट लाभ मिळणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया या विशेष गाडीच्या…

Read More

एका हिंदू तरुणीला धर्मांतर करून तिच्याकडून मुस्लिम धर्माचे धडे दिले जात होते, नाशिक येथील एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीतील वरिष्ठांकडून हिंदू कर्मचाऱ्यांना धर्मांतर करण्याचे रॅकेट काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतीत एका हिंदू तरुणीला धर्मांतर करून तिच्याकडून मुस्लिम धर्माचे धडे दिले जात होते, ही माहिती समोर आली आहे. त्या पीडित हिंदू मुलीला तीन वर्षे झाले. तिला मुस्लिम समाजाचे रोजे करण्यास भाग पाडले होते. ती तरुणी गेल्या तीन वर्षात ओठाला लिपस्टिक सुद्धा लावत नव्हती. तिच्यावर धर्मांतरासोबतच मानसिक छळ देखील करण्यात येत होता. म्हणजे तिची मानसिक छेडछाड करण्यात येत होती. यामध्ये हिंदू मुलींना टार्गेट करण्यात येत होते. त्या हिंदू मुलींचे धर्मांतराच्या…

Read More

संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. जळगाव । जळगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. नुकताच राज्य शासनाच्या बदली आणि पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य पोलिस सेवेतील अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नखाते यांच्या बदलीची स्वतंत्र ऑर्डर निघणार असल्याने त्यांची नियुक्ती अद्याप कुठे करण्यात आले हे कळू शकले नाही. यावेळी अशोक नखाते यांनी नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर संदीप गावित यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक…

Read More

शहरात भरदिवसा कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना घडली आहे. जळगाव । जळगाव शहरात भरदिवसा कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना घडली आहे. ‘महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्या’चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असून, या घटनेत सपकाळे जखमी झाले आहेत. दरम्यान, संतापलेल्या टोळक्याने त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुकुंद सपकाळे हे आपल्या चारचाकी वाहनाने रिंगरोड वरून बहिणाबाई गार्डनकडे जात असताना यादरम्यान, काही तरुणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या आणि शस्त्रांच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सपकाळे यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गाडीची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोरांनी…

Read More

जळगावकरांनो काळजी घ्या ! जळगाव । एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच जळगाव जिल्ह्याने आपले ‘हॉट’ शहर असल्याचे रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत जळगावच्या तापमानात तब्बल ५ अंशांहून अधिक वाढ झाली असून, जिल्ह्याचा पारा आता ४१ अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी जळगावच्या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता तुलनेने कमी होती. गुरुवारी जळगावचे तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र, अवघ्या ४८ तासांत तापमानात मोठी वाढ होऊन शनिवारी हा आकडा ४१ अंशांवर जाऊन ठेपला आहे. कोरड्या हवेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने…

Read More

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन ; 92 व्या वर्षी संगीतविश्व पोरकं मुंबई । भारतीय संगीतविश्वाला आज मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ आणि बहुमुखी पार्श्वगायिका यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतरत्न Lata Mangeshkar यांच्या लहान बहिणी असलेल्या आशा भोसले यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी R. D. Burman, O. P. Nayyar, S. D. Burman आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करत अनेक अजरामर…

Read More

शहरात नियोजनाचा अभाव जाणवत होता. भुसावळ प्रतिनिधी : शहर एकेकाळी लहान खेड्यासारखे भासत होते. कापडाच्या दुकानांची स्थिती टपऱ्यांसारखी होती, शहरात नियोजनाचा अभाव जाणवत होता. मात्र या परिस्थितीत मोठा बदल घडवून आणण्याचे श्रेय संतोष भाऊ चौधरी यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टी, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भुसावळ शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.पूर्वी ज्या ठिकाणी साधी, असुविधायुक्त दुकाने होती, त्याच ठिकाणी आधुनिक, अद्ययावत दुकाने उभी राहिली आहेत. शहरातील व्यापाराला नवी दिशा मिळाली आणि व्यापाऱ्यांसाठी अधिक चांगले वातावरण तयार झाले. बाजारपेठेत उभे राहिलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स हे या विकासाचे ठळक उदाहरण आहे.नगरपालिकेच्या पडक्या शाळांची जागा आता भव्य आणि सुसज्ज शैक्षणिक कॉम्प्लेक्सने घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध…

Read More

शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भुसावळ प्रतिनिधी : शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगरसेवकांवर थेट आरोप करत, “भुसावळच्या विकासाला मुद्दाम अडथळे निर्माण केले जात आहेत,” असे स्पष्टपणे सांगितले आहे . पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या बैठकीत वारंवार अडथळे निर्माण केले जातात, माईक हिसकावून घेणे, निर्णय प्रक्रियेत अडथळे आणणे अशा प्रकारे कामकाजात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. “मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.भंगाळे पुढे म्हणाल्या की, विकासकामांसाठी त्या विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा करत असून, जनतेच्या आशीर्वादाने…

Read More

चार वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असताना संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या निवासी नायब तहसीलदार यांच्या अनियमित उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असताना संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, नायब तहसीलदार वेळेवर कार्यालयात येत नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. तसेच, सायंकाळीही कार्यालयीन वेळ पूर्ण होण्यापूर्वीच ते निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वेळा दुपारी किंवा सायंकाळी चार-साडेचारनंतरच त्यांची उपस्थिती दिसून येते,…

Read More