Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताहास सुरवात.

ताज्या बातम्या

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताहास सुरवात.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला आहे.

यावल प्रतिनिधी : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला आहे. सदर सोहळा हा दिनांक १५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. यानिमित्ताने गुरुचरित्र पारायण साठी मोठ्या संख्येत भाविक, भक्तांची येथे दररोज आता उपस्थितीत लाभणार आहे.पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.


शहरात भुसावळ रस्त्यालगत श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुवार पासून अखंड नाम यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजता औदुंबर प्रतीक्षणा, ८ वाजता भूपाळी, सकाळी ८ वाजे पर्यंत सामूहिक गुरुचरित्र वाचन त्याच वेळी यज्ञ, मंडपात प्राथमिक स्वरूपात सेवेकरांकडून नित्य स्वाहाकार, सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरती, मंत्र पुष्पांजली, सकाळी साडे दहा ते साडेबारा विशेष याग, दुपारी १२:३० ते २ भोजन आणि विश्रांती, दुपारी दोन ते सहा दुर्गा सप्तशती व श्री स्वामी समर्थ चरित्र पठण, एक आवर्तन रुद्राध्याय ग्राम अभियान अंतर्गत १८ विभागाचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर साडेसहा वाजता औदुंबर प्रदक्षणा, नैवेद्य आरती, विशेष मार्गदर्शन, सायंकाळी सात ते आठ नित्यसेवा येथे चालली तर समस्त भाविक, भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ जप, एक माळ, नित्य ज्ञान, गीतेचा पंधरावा अध्याय, गीताई मनाचे श्लोक वाचन, पसायदान, तुकारामांचा अभंग, विष्णुसहस्त्रनाम वाचन, श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप करण्यात आले. तर संपूर्ण सप्ताह भर १५ एप्रिल पर्यंत सदर कार्यक्रम चालणार असून यात गुरुवारी मंडळ स्थापना, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार पार पडले. शुक्रवारी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, श्री मनोबोध याग, शनिवारी नित्य स्वाहाकार, श्री चंडीका याग, रविवारी नित्यसहाकार श्री स्वामी याग, सोमवारी नित्यसहाकार श्री गीताई याग, विष्णू सहस्त्रनामावली हवन, मंगळवारी नित्य स्वाहाकार श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग, तर १५ एप्रिल बुधवार रोजी नित्यसहाकार बली पूर्णाहूती, श्री सत्य दत्तपूजन, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सांगता समारोप, सकाळी साडेदहा वाजता महाआरती व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता होईल.


या सप्ताहात सर्व सेवेकरी प्रयोग करून घेत आहे

( श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताहात अखंड सात दिवस स्वामी समर्थ ग्रंथाचे वाचन, नाम जप, व विना वादन चालू आहे. सकाळी 7 ते सायंकाळी सात पर्यंत महिला व रात्री पुरुष सेवेकरी सेवा देत आहे.)

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add