
एका हिंदू तरुणीला धर्मांतर करून तिच्याकडून मुस्लिम धर्माचे धडे दिले जात होते,
नाशिक येथील एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीतील वरिष्ठांकडून हिंदू कर्मचाऱ्यांना धर्मांतर करण्याचे रॅकेट काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतीत एका हिंदू तरुणीला धर्मांतर करून तिच्याकडून मुस्लिम धर्माचे धडे दिले जात होते, ही माहिती समोर आली आहे. त्या पीडित हिंदू मुलीला तीन वर्षे झाले. तिला मुस्लिम समाजाचे रोजे करण्यास भाग पाडले होते. ती तरुणी गेल्या तीन वर्षात ओठाला लिपस्टिक सुद्धा लावत नव्हती. तिच्यावर धर्मांतरासोबतच मानसिक छळ देखील करण्यात येत होता. म्हणजे तिची मानसिक छेडछाड करण्यात येत होती. यामध्ये हिंदू मुलींना टार्गेट करण्यात येत होते. त्या हिंदू मुलींचे धर्मांतराच्या नावाखाली लैंगिक शोषण करण्यात येत होते. या प्रकरणी नाशिकच्या आयटी कंपनीतील टीम लीडरसह सहा जणांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यापैकी एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून पोलीस तपासातून धक्कादायक आणि डोकं चक्रावणारी माहिती हाती येत आहे. नाशिक मधील नामांकित कंपनीत कथित धर्मांतर प्रकरण उघड झाले आहे. सदर हिंदू मुलींमध्ये वर्षानुवर्षे तिच्या वागणुकीत बदल घडवून आणला आला आहे. ही मुलगी हिंदू असूनही हिंदू मित्र मैत्रिणींबरोबर जेवण्यास नकार देत असे. तिला नॉनव्हेज खायला दिले जायचे आणि त्या नॉनव्हेजची तिला इतकी सवय लागली की, ती एकटीच जेवण करायला जात असे. या प्रकरणात आरोपीकडून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात होते. काही विशिष्ट तरुणींना त्यांच्या जाळ्यात ओढले जात होते. आरोपीच्या वतीने संबंधित तरुणीला विशिष्ट प्रकारचा पोशाख घातला म्हणून तिचा मानसिक छळ केला जात होता. वेळप्रसंगी तिच्यावर या आरोपींकडून जबरदस्ती म्हणजे बलात्कार करण्यासाठी प्रयत्न झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या मल्टिनॅशनल कंपनीत धर्मांतराचे रॅकेट काम करायचे ते अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने केले जात होते. एकंदरीत मुलांपेक्षा मुलीला जास्त टार्गेट करून त्यांच्या धर्मांतराची केस हे हाती घ्यायचे. मुलीचे धर्मांतर करून त्यांचे लैंगिक शोषणही करण्यात येत होते.
अशा या मल्टिनॅशनल कंपनीतील आपल्या कामाबरोबर हे धर्मांतराचे रॅकेट येथे सुरू असायचे. दरम्यान या मल्टिनॅशनल कंपनी मधील या कथित धर्मांतर विरोधात नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात केवळ धर्मांतरच नव्हे तर जबरदस्तीने छेडछाड केल्याचे देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवळाली पोलीस ठाण्यात जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात इतर गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण नऊ गुन्ह्यातील चार गुन्हे हे छेडछाडीचे आहेत. तीन गुन्हे छेडछाड आणि धर्मांत धर्मांध भावना दुखावल्याचे आहेत. एक गुन्हा धार्मिक द्वेष पसरवल्याचा दाखल झाला आहे. या कंपनीत जे हिंदू कर्मचारी होते त्यांना नमाज पठणासाठी जबरदस्ती केली जात होती असे कळते. तसेच त्यांना जबरदस्तीने गोमास खाण्यास भाग पाडले होते असे कळते. धर्मांतरणाचा हा प्रकार धक्कादायक आहे. हे सर्व प्रकरण पाहता या कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचेवतीने इतर कर्मचारी सुद्धा त्यात सहभागी होते असे कळते. या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत,
तेच मुळात अशा प्रवृत्तीचे आहेत, की नाही याचा शोध घेणे सुरू आहे. जर कंपनीचे डायरेक्टर अशा पद्धतीने धर्मांतर करण्यास भाग पाडत असतील तर हे फार वाईट आहे. जर कंपनीच्या डायरेक्टरचा यात समावेश असेल तर हे कंपनी वरिष्ठ अधिकारी आपली मनमानी करीत आहेत, असा त्याचा अर्थ होतो आणि इतर कंपनीच्या मालक लोकांचा सहभाग असेल तर वरिष्ठ कर्मचारी आणि मालक यांच्यात मिलीभगत असून त्यांच्या सहकार्याने हे धर्मांतर रॅकेट चालत असले पाहिजे. जर तसे असेल तर ही मल्टिनॅशनल आयटी कंपनी देशद्रोही आहे, असे समजायला काही हरकत नाही.
त्यासोबत या आयटी कंपनीवर शासनाकडून योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ती शासनाने केलीही पाहिजे. एकंदरीत कारवाई करून कंपनी बंद पाडण्यापेक्षा कंपनी चालू ठेवून योग्य ती कारवाई कशी करता येईल? याचा विचार झाला पाहिजे. जेणेकरून कंपनीतील वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या घरचा रस्ता दाखवून तिला पाहिजे. जेणेकरून हे अधिकारी पुन्हा अशा वाटेला जाणार नाहीत. धर्मांतर हे कुठलेही का असे ना ते होता कामा नये. मुस्लिम असेल तरीही त्याला हिंदू करण्याचा प्रयत्न झाला नाही पाहिजे. एकंदरीत प्रत्येकाला स्वतंत्र धर्म स्वीकारायचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न होऊ नये..!


