Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल नगरपरिषद साठवण तलाव बाबतची जनहित याचिका उच्च न्यायलाययाने फेटाळली.

ताज्या बातम्या

यावल नगरपरिषद साठवण तलाव बाबतची जनहित याचिका उच्च न्यायलाययाने फेटाळली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 12, 2026No Comments4 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

आयोजित पत्रकार परिषद लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील नगरपरिषद सदस्य उपस्थित होते.

यावल प्रतिनिधी : यावल नगरपरिषद साठवण तलावाबाबत भाजपाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी दाखल केलेली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आयोजित पत्रकार परिषद लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील नगरपरिषद सदस्य उपस्थित होते.

यावल नगरपरिषदेने सन २०१७ मध्ये १०० दशलक्ष लिटर प्रति दिवस (MLD) क्षमतेची, प्लॅस्टिक लायनिंग असलेली गळतीमुक्त पाणी साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्यात आली होती.आर.एस. महाजन यांना सदर कामासाठी विहित निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. १० डिसेंबर २०१८ रोजी PMC म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यावल नगरपरिषदेला प्रस्तावित साठवण टाकीचा तपशीलवार आयटम निहाय प्रकल्प अंदाज आराखडा आणि नकाशा सादर केला होता त्यानुसार दि. २८जून २०२० रोजी ३,१३,३१,०८६/- रुपयांच्या एकूण अंदाजित रकमेला.तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती.

तांत्रिक मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून प्रशासकीय मान्यता मिळवली होती.परंतु सदर कामात अपहार आणि अनियमितते बाबत येथिल तत्कालीन भाजपा तालुका अध्यक्ष उमाकांत फेगडे यांनी १०० MLD क्षमतेच्या टाकीची प्रत्यक्ष क्षमता केवळ २० ते २५ एम एल डी एव्हढीच असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी,फैजपूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती मात्र चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच उमाकांत फेगडे यांनी मुंबई उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद येथे सार्वजनिक जनहित याचिका दाखल केली होती. सदर तक्रारी मुळे व न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने तेव्हा यावल शहरात खळबळ उडाली होती व अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते या कामात अशी कुठलीही अनियमितता अथवा अपहार झालेला नाही असा प्रतिवाद तेव्हाचे सताधारी गटातील सर्व नगरसेवक यांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे नेतृत्वात पत्रकारपरिषद घेऊन स्पष्ट केले होते.

सदर जनहित याचिकेचा निकाल ६ एप्रिल २०२६ रोजी लागलेला असून उमाकांत फेगडे यांनी दाखल केलेली याचिका दखल घेणे योग्य वाटत नाही असे खंडपीठाने म्हटले आहे.परिणामी ही याचिका फेटाळण्यात आली आहे अशी माहिती यावल पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांचे समवेत सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ छायाताई पाटील, गटनेता सागर चौधरी,उपाध्यक्ष सईदा.बी शेख,पराग सराफ,सौ. वैशाली बारी,शिवसेना तालुका प्रमुख शरद कोळी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यायालयाचे निरीक्षण …

१)याचिकाकर्त्याने काही कागदपत्रे रेकॉर्ड वर सादर केलेले आहेत अंतर्गत पत्रव्यवहाराच्या प्रती याचिकाकर्त्यांच्या हाती कशा लागल्या, हा प्रश्न आहे असे म्हटले आहे. २) याचिकाकर्त्याने केवळ विधान करणे पुरेसे ठरणार नाही जो पर्यंत प्राथमिक पुरावा (prima facie material) उपलब्ध होत नाही तोपर्यंत चौकशीचे आदेश देता येणार नाहीत.


३)शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने जो तांत्रिक मूल्यमापनाचा अहवाल दिला आहे तो कथित अपहाराबद्दल भाष्य करू शकत नाही.सदर अहवालाच्या निष्कर्षानुसार “साहित्याच्या चाचणीचे निकाल आणि साईट भेटीच्या निरीक्षणावरून यावल नगरपरिषद, जि. जळगाव येथील १४ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत अतिरिक्त पाणीपुरवठा साठवण टाकीचे ८६.००% पूर्ण झालेले काम समाधानकारक आहे” ४) अशा प्रकारे,प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे तांत्रिक मूल्यमापन किंवा गुणवत्ता नियंत्रण झाले आहे का, किंवा त्यात काही गंभीर त्रुटी आहेत का, हे इतर कागदपत्रांवरून स्पष्ट होत नाही. ५) अशा परिस्थितीत आणि रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या सामग्रीच्या आधारे , भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत या प्रकरणाची दखल घेणे आम्हाला योग्य वाटत नाही. ६) परिणामी, ही याचिका फेटाळण्यात येत आहे.

बातमीत खालील चौकट घेणे

खोट्या तक्रारीमुळे त्रस्त झालेल्या एका तत्कालीन बदली झालेल्या अभियंत्याने तक्रारदारास काहीतरी चिरीमिरी घेऊन तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून गयावया केली त्यानुसार गेल्या ८/१० दिवसापूर्वी तोडपाणी बहाद्दर व एक स्वतःला प्रज्ञावंत समजणारा वकील त्यांची गाडी घेऊन अहिल्यानगर येथे गेले होते.अभियंत्याने जास्तीत जास्त ७५ हजार रुपये देऊ शकतो असे सांगितले तर तोडी बहाद्दर वकिलाने ५ लाखाची मागणी केली होती. या संपूर्ण प्रकाराची ऑडिओ रेकॉर्डिंग झालेली असून ती प्राप्त झाल्यावर संबंधितांची नावे खुले करण्यात येतील अशी माहिती अतुल पाटील यांनी दिली.पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन नगरसेवक पराग यांनी करून आभार प्रदर्शन केले.

“जनहित “नावाखाली “स्वहीत ” जपणाऱ्यांना उच्च न्यायलायने दाखवली त्यांची जागा!— अतुल पाटील. शहरामध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व जुना साठवण तलावाला गळती होत असल्याने व गाळ काढण्यासाठी नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय नगरपरिषदने घेतला होता त्यानुसार सदर काम सर्व मंजुरी घेऊन रीतसर सुरू करण्यात आले होते व काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष उमाकांत फेगडे यांनी सदर कामाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सदर तक्रार खोटी आहे असे मी सातत्याने जीव तोडून सांगत होतो.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add