Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एरंडोल पोलीस ठाण्यात तब्बल चार ते पाच तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणामुळे परिसरात मोठे राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने तणाव काही प्रमाणात निवळला.किशोर बाविस्कर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी एरंडोल शहरातील छोट्या व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धडक देत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांवर…

Read More

​ जळगाव प्रतिनिधी | देशातील वाढती विकृत जिहादी मानसिकता, अवैध भू-संपादने आणि सुनियोजित कटांच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झाली आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा बजरंग दलाच्या वतीने माननीय राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक सविस्तर मागणीचे निवेदन आज सादर करण्यात आले. ​या निवेदनात बजरंग दलाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि सामाजिक ताण्याबाण्यावर होणाऱ्या आघातांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सारख्या नामांकित संस्थांच्या परिसरात उघडकीस आलेल्या प्रकरणांचा हवाला देत, ‘लव्ह जिहाद’चे जाळे आता सुशिक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत पोहोचल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील कथित घटनांचा उल्लेख करत हिंदू तरुणींचे…

Read More

“झाडे वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. जळगाव प्रतिनिधी : वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमातून “झाडे वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळा परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील झाडांना पाणी घालून त्यांची देखभाल करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जाणीव निर्माण झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगत झाडांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. “झाडे हेच आपल्या जीवनाचे आधार आहेत, त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे…

Read More

भुसावळ शहराचा विकास करण्याची साधी कल्पना सुद्धा सुचली नव्हती. भुसावळ– शहर तालुक्याचे आणि रेल्वेचे एक महत्त्वाचे प्रसिद्ध शहर होते आणि आहे काही वर्षांपूर्वी भुसावळ शहराची पूर्ण रचना ही एखाद्या खेडेगावाप्रमाणे होती तत्कालीन कोणत्याही नेत्याला भुसावळ शहराचा विकास करण्याची साधी कल्पना सुद्धा सुचली नव्हती. भुसावळ शहराचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी शहरातील जामनेर रोड,जळगाव रोड, वरणगाव रोड तसेच यावल रस्त्याचे रुंदीकरण करून भुसावळ शहराच्या सौंदर्यात प्रथम आणि मोठी लक्षवेधी भर टाकली आहे.संतोषभाऊ चौधरी यांचा सर्व समावेशक असा विकासाचा अजेंडा होता त्यावेळेस भुसावल शहरात दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असतात तर भुसावळ शहरातील वरील ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करू शकला नसता परंतु…

Read More

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे आहे. भुसावळ तिनिधी : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी करदाता नागरिक म्हणून पुढे येत दोन्ही बाजूंना संयम आणि विकासाभिमुख भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. नेमाडे यांनी स्पष्ट केले की, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे आहे. समितीचा निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक स्तरावर त्यासंदर्भात आरोप करणे योग्य नसून त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले…

Read More

महापालिकेचे पथक शहराच्या वर्दळीच्या आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात धडकले, जळगाव । जळगाव शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून मंगळवारी (२१ एप्रिल) अतिक्रमण विरोधी मोहिमेचा दुसरा टप्पा अत्यंत आक्रमकपणे राबवण्यात आला. महापालिकेचे पथक शहराच्या वर्दळीच्या आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात धडकले, ज्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी ते प्रभात चौक दरम्यानच्या समांतर रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्स आणि टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. आजच्या मोहिमेत मनपाच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे रस्त्यावर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे…

Read More

नव्या तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या आजारांचे अचूक निदान करणे आता अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे. जळगाव । आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करत रुग्णांना अधिक अचूक व जलद उपचार मिळावेत या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागात अत्याधुनिक व्हीडीओ एन्डोस्कोपी मशीनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या आजारांचे अचूक निदान करणे आता अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे. व्हीडीओ एन्डोस्कोपी ही एक प्रगत तपासणी पद्धत असून, यामध्ये सूक्ष्म कॅमेर्‍याच्या सहाय्याने नाक, घसा आणि कानातील आतील भाग स्पष्टपणे पाहता येतो. पारंपरिक तपासण्यांच्या तुलनेत ही पद्धत अधिक तपशीलवार माहिती देणारी असल्यामुळे डॉक्टरांना आजाराचे मूळ कारण ओळखणे सुलभ होते. त्यामुळे उपचार अधिक…

Read More

गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांत पोलिसांनी हा तपास पूर्ण करत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. जळगाव । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा येथील प्रदीप महाजन (माळी) हत्याकांडाचा छडा लावला आहे. मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या धावत्या रेल्वेत पोलिसांनी सापळा रचून दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांत पोलिसांनी हा तपास पूर्ण करत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय होती? चोपड्यातील तारामती नगरमधील रहिवासी प्रदीप राजेंद्र महाजन-माळी (वय ३३) यांची १९ एप्रिलच्या रात्री अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचा चेहरा आणि डोके दगडाने ठेचून मृतदेह चोपडा शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ फेकून देण्यात आला होता. २० एप्रिल रोजी सकाळी ही…

Read More

जळगाव दौऱ्यात नुकतीच ब्रम्हचैतन्य वेदपाठशाळेस भेट देवून माहिती घेत भरघोस मदतीचे आश्वासन दिले आहे. जळगाव । परशूराम आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि शिवसेना नेत्या अर्चनाताई सुरडकर यांनी आपल्या जळगाव दौऱ्यात नुकतीच ब्रम्हचैतन्य वेदपाठशाळेस भेट देवून माहिती घेत भरघोस मदतीचे आश्वासन दिले आहे.जळगाव शहरात नुकतीच भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दि १८ रोजी अर्चनाताई सुरूडकर यांनी पालखी महोत्सव तर रविवारी कॅप्टन आशिष दामले यांनी बहुभाषिक ब्राम्हणसंघ आयोजीत भगवान परशूराम जयंती सोहळयास उपस्थीती दिली. ब्रह्मश्री परिवारचे अशोक वाघ यांच्या विनंतीवरून या दोन्ही पाहुण्यांनी पूर्वनियोजित दौर्यामध्ये ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट दिली.तेथील वेदाचार्य गढीकर व वेद अभ्यासक विद्यार्थ्यांशी चर्चा करून…

Read More

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. जळगाव – विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. संप काळात कार्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांनाही माघारी फिरावे लागले. जिल्ह्यात आज राज्यव्यापी संपाचा व्यापक परिणाम पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच कर्मचाऱ्यांची गर्दी उसळली होती. एकत्र येत त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या…

Read More