Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»आकाशवाणी आणि प्रभात चौकातील जळगाव मनपाची अतिक्रमणावर कारवाई

ताज्या बातम्या

आकाशवाणी आणि प्रभात चौकातील जळगाव मनपाची अतिक्रमणावर कारवाई

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

महापालिकेचे पथक शहराच्या वर्दळीच्या आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात धडकले,

जळगाव । जळगाव शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून मंगळवारी (२१ एप्रिल) अतिक्रमण विरोधी मोहिमेचा दुसरा टप्पा अत्यंत आक्रमकपणे राबवण्यात आला. महापालिकेचे पथक शहराच्या वर्दळीच्या आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात धडकले, ज्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी ते प्रभात चौक दरम्यानच्या समांतर रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्स आणि टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. आजच्या मोहिमेत मनपाच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे रस्त्यावर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले असून, यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहरातील समांतर रस्ते हे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, मात्र हॉकर्सच्या अतिक्रमणामुळे येथे नेहमीच कोंडी होत असे. आजच्या या धडक कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांनी मनपाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील रस्ते जोपर्यंत पूर्णपणे मोकळे होत नाहीत आणि वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही ‘धडक मोहीम’ थांबणार नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add