Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskApril 22, 2026Updated:April 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एरंडोल पोलीस ठाण्यात तब्बल चार ते पाच तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणामुळे परिसरात मोठे राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने तणाव काही प्रमाणात निवळला.

किशोर बाविस्कर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी एरंडोल शहरातील छोट्या व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धडक देत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी बाविस्कर यांनी गुटखा विक्री करणाऱ्या काही छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान त्यांनी संबंधितांकडून सुमारे 20 हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, रक्कम स्वीकारल्यानंतरही त्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही बाब समजताच आमदार पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी एरंडोल पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले.

या आंदोलनावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमले होते. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही,” अशी ठाम भूमिका आमदारांनी घेतल्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतरच आमदारांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add