जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी रात्री शहरात ठिकठिकाणी व्यापक नाकाबंदी करण्यात आली. सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचकशहरातील मुख्य चौक आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी ही नाकाबंदी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने कर्णकर्कश आवाज करणारे ‘सायलेन्सर’, फॅन्सी नंबर प्लेट्स, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसणे आणि सिग्नल तोडणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी लक्ष्य केले.मोटार वाहन कायद्यानुसार या सर्वांवर दंडात्मक कारवाई करून कायदेशीर समज देण्यात आली. टवाळखोरांना…
Author: Editorial Desk
जळगाव, प्रतिनिधी | राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ ही केवळ कागदावरची योजना नसून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारी आहे. ही योजना खऱ्या अर्थाने बळीराजासाठी वरदान ठरेल, असा विश्वास जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि उपस्थिती या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे यांनी योजनेच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. गुणवत्तेवर पालकमंत्र्यांचा भर पालकमंत्री पुढे म्हणाले की, “या योजनेद्वारे शेतात…
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्रास सुरूच होता. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्यातील एका गावात पीडित विद्यार्थिनी दररोज शाळेत जात असताना, संशयित आरोपी मनीष विजय पाटील, योगराज आणि रितेश दिनेश गोलाईत हे तिला अडवून अश्लील कमेंट्स करत होते. संशयित आरोपींचे हे कृत्य मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू होते, ज्यामुळे पीडित विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती. अखेर, त्रासाचा कळस झाल्यामुळे पीडितेने आपल्या पालकांना विश्वासात…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्क ते खोटेनगर परिसरात शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई करत समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली. या कारवाईदरम्यान एका महिलेने पथकाशी हुज्जत घालत वाद घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने कारवाई सुरू ठेवत अनेक टपऱ्या, हातगाड्या आणि वाहने जप्त केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जात आहे. त्याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून मानराज पार्क ते खोटेनगर दरम्यान जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुकाने, टपऱ्या, हातगाड्या तसेच रस्त्यांवर उभी असलेली वाहने हटवून जप्त करण्यात आली.…
रावेर प्रतिनिधी । रावेरच्या राजकीय पटलवर सध्या एकाच नावाच्या चर्चेने जोर धरला आहे, ते म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर महाजन. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाजन यांच्या नावाची संभाव्य उमेदवारी कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षनिष्ठा, अफाट जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली नाळ यामुळे महाजन यांचे पारडे जड मानले जात आहे. जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व :रावेल तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असलेले नंदकिशोर महाजन हे केवळ राजकीय नेते नसून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. रावेर, मुक्ताईनगर आणि यावल या पट्ट्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. २४ तास मोबाईलवर उपलब्ध राहून लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांना एक ‘आदरणीय’ स्थान…
जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या ममुराबाद रोडवरील चर्चित बोगस कॉल सेंटर प्रकरणात अडकलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेल्या कोल्हे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला असून, यामुळे त्यांची कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाने त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर धाडसी कारवाई करत एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. परदेशी नागरिकांना लक्ष्य करून त्यांची ऑनलाइन फसवणूक आणि लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईतून समोर आला होता. या प्रकरणात ललित कोल्हे यांच्यासह कोलकात्यातील…
फैजपूर प्रतिनिधी | फैजपूर शहरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली असून, लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १६ वर्षांची असून ती फैजपूर शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. आरोपी १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त सतरा वर्षीय बालकाने 0 पीडित मुलीला लग्नाच्या आम्हीच दाखवून तिच्यावर सहा महिन्यांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असून गेल्या पंधरा दिवसांपासून ही कारवाई सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून अतिक्रमण विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन ते मानराज पार्क या दरम्यान विशेष कारवाई राबवली. या कारवाईदरम्यान महामार्गाच्या कडेला उभारण्यात आलेल्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकाने व टपऱ्यांवर बुलडोझर चालवण्यात आला. अनेक अतिक्रमणे हटवून साहित्य जप्त करण्यात आले. तसेच समांतर रस्त्यावर बेकायदेशीररीत्या उभ्या असलेल्या पाच वाहनांवरही कारवाई करत ती जप्त करण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली, तर नागरिकांनी मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी या उपक्रमाचे स्वागत…
एरंडोल- महा लाईव्ह न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात एका ४४ वर्षीय सफाई कामगार महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत आणि हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला कासोदा येथील एका शासकीय कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. २२ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या घराचे गेट बंद करत असताना संशयित आरोपी हकीम खान उर्फ काल्या जमशेर खान याने अचानक गेटला लाथ मारून दहशत निर्माण केली. पीडित महिलेने याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर शहरात विश्वासघाताची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एथर शोरूममध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच शोरूममधील लॉकर फोडून १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एथर शोरूमचे मॅनेजर दीपक नितीन मोरे यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल रोजी शोरूमचे कामकाज आटोपून सर्व कर्मचारी घरी गेले होते. याच संधीचा फायदा घेत शोरूममधील हाऊस कीपिंग कर्मचारी महेश राजेंद्र देवरे याने रात्री शोरूममध्ये शिरून चोरी केली. त्याने लॉकरमधील ५०० रुपयांच्या ३३६ नोटा, म्हणजेच १ लाख ६८ हजार रुपये चोरले. दुसऱ्या दिवशी सकाळी…

