जामनेर-प्रतिनिधी : आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीने जळगाव जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून जामनेर शहर व तालुका संघटन बांधणी आणि आढावा बैठक २० जून रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याचा आणि युवकांना मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचा निर्धार करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला वंचित बहुजन युवक आघाडीचे जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे, जिल्हा संघटक बबन कांबळे आणि ॲड. राजू मोगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटन कौशल्याचे महत्त्व पटवून दिले आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
‘गाव तिथे शाखा’ निर्माण करण्याचा संकल्प :
या बैठकीत जामनेर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीची ताकदीने संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान राबवून प्रत्येक गावात पक्षाचे नेटवर्क उभे करण्याचा संकल्प सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने केला. या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, आगामी काळातील विविध रिक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुण व तडफदार युवकांच्या यावेळी थेट मुलाखती घेण्यात आल्या.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती :
या आढावा बैठकीला पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये संगम निकम, अरुण सुरवाडे, सुभाष शिंदे, प्रल्हाद सोनवणे, राहुल साबळे, गौतम वाघ, परमेश्वर जंजाळे, राहुल सुरवाडे, योगेश गोसावी, धम्मपाल इंगळे, रुपेश साळुंके, भागवत सुरळकर, जमील पिंजारी, संदीप बावस्कर, हाफिज पटेल, विश्वदीप वाकोडे, आनंद मेढे, प्रवीण जमदाडे, अतुल सपकाळे, शुभम सोनवणे, मोहित सुरवाडे, बाबुराव सुरवाडे यांच्यासह अनेक सक्रिय पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमुळे जामनेर तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.



