Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहरातील ब्रह्मश्री संस्थेच्या भगवान परशुराम पालखीचे स्वागत

जळगाव

जळगाव शहरातील ब्रह्मश्री संस्थेच्या भगवान परशुराम पालखीचे स्वागत

Editorial DeskBy Editorial DeskApril 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करत श्री परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा

जळगाव – शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त श्री परशुराम पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.या प्रसंगी श्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी 6 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करत श्री परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा प्रेम नगरातील श्री सप्तशृंगी मंदिरात पोहचली. घरोघरी श्री परशुराम पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

श्री सप्तश्रृंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, जळगाव जनता बँकेचे सतीश मदाने, वेद पाठशाळा प्रमुख देवेंद्र गढीकर गुरुजी, हभप मुकुंद महाराज धर्माधिकारी,शिवसेना जिल्हा उप संघटक मुरबाड तथा ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक अर्चना सुरडकर, भाजपा स्वीकृत नगरसेवक सुभाष शौचे, ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्ष रेखा कुळकर्णी, अजय कुळकर्णी, पालखी प्रमुख प्रसाद पटवे उपस्थित होते.


समाज बांधवांना मार्गदर्शन करताना दादा महाराज यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज हा समाजाचा आरसा आहे. आदर्श आहे त्यांनी याचे भान ठेवून परिवारातील संस्कारांकडे कटाक्षाने लक्ष देवून योग्य असे आचरण केले पाहिजे, परिवार सक्षम, ज्ञानी, विनम्र सेवाभावी कसा होईल याकरता प्रयत्न केले पाहिजे, सनातन धर्माचे पालन करून समाज संघटित होण्यासाठी कार्य झाले पाहिजे, आपसी भेद भाव न बाळगता समाज एकसंघ होण्यासाठी, सुरक्षित होण्यासाठी लक्ष देणे अपेक्षित आहे असे सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add