Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने घराघरांत कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.

ताज्या बातम्या

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने घराघरांत कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

उन्हाळ्यात कुलरचा वापर वाढला ; महावितरणचे नागरिकांना सजगतेचे आवाहन

जळगाव : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने घराघरांत कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास कुलरमुळे विद्युत अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना आवश्यक विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कुलर वापरताना नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करणे अत्यावश्यक आहे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा पूर्णपणे बंद करून प्लग काढणे गरजेचे आहे. तसेच पाणी भरताना ते बाहेर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ओलसर जमीन आणि वीज यांचा संपर्क धोकादायक ठरू शकतो.

कुलर चालू असताना त्याच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू नये आणि ओल्या हाताने कुलर हाताळणे टाळावे. कुलरचे वायरिंग आणि कनेक्शन अधिकृत तज्ञांकडून तपासून घेणे तसेच योग्य अर्थिंग केल्याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य अर्थिंगमुळे लिकेज करंटपासून संरक्षण मिळते.

लहान मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांना कुलरपासून दूर ठेवणे आणि त्यांना कुलरजवळ खेळू न देणे आवश्यक आहे. याशिवाय, खराब किंवा जीर्ण वायर त्वरित बदलणे, कुलर हलवताना प्लग काढणे, तसेच दुरुस्ती करताना वीजपुरवठा बंद ठेवणे यांसारख्या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करावी. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवणेही सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा पंप ठराविक वेळ चालू-बंद ठेवणारे सर्किट वापरल्यास वीज बचत होऊ शकते.

थोडीशी दक्षता आणि योग्य उपाययोजना केल्यास कुलरचा वापर सुरक्षित आणि अपघातमुक्त होऊ शकतो, असे सांगत महावितरणने नागरिकांना या नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add