Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव बसस्थानक येथे चढताना महिलेचे मंगळसूत्र लंपास; पोलीसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

चाळीसगाव बसस्थानक येथे चढताना महिलेचे मंगळसूत्र लंपास; पोलीसात गुन्हा दाखल

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९, रा. काकळणे, ता. चाळीसगाव) या मंगळवारी २१ एप्रिल दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्या पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र (वजन ६ ग्रॅम) लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता.

या घटनेनंतर पीडित महिलेने त्वरित चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव हे करत आहेत. बस स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add