Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»मुक्ताई पालखीसाठी नव्या भव्य रथाचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

जळगाव

मुक्ताई पालखीसाठी नव्या भव्य रथाचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

Editorial DeskBy Editorial DeskJune 24, 2026Updated:June 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी  | संत श्रीमुक्ताई महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य आणि आकर्षक रथाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रस्थान दिनी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या चर्चेत दिलेले आश्वासन त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आज २४ जून रोजी मुक्ताई पालखीचे प्रस्थान होणार असल्या कारणामुळे आज या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते लोकांपर्यंत करण्यात येणार आहे.

गतवर्षी संत श्रीमुक्ताई यांच्या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आल्यानंतर व्यस्त दौरा असूनही एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे उपस्थित राहून संत मुक्ताईंचे दर्शन घेतले आणि भाविकांशी संवाद साधला होता. याच वेळी संत मुक्ताबाईंच्या पालखीचा जुना रथ बदलून नवीन रथ उभारण्याची आवश्यकता संस्थानच्या वतीने मांडण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन रथ देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानुसार मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या देखरेखीखाली तसेच माउलीभक्त विनीत सबनीस आणि सौ. शीतलताई म्हात्रे यांच्या समन्वयातून संत मुक्ताबाईंच्या पालखीसाठी नवीन, भव्य आणि आकर्षक रथ साकारण्यात आला आहे. संत मुक्ताईंच्या प्रस्थान दिनी या रथाचे लोकार्पण होणार असून वारकरी संप्रदाय आणि भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. दिलेला शब्द कृतीतून पूर्ण झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add