Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»टवाळखोर आणि मद्यपींवर पोलिसांचा थेट प्रहार; शाळा, कॅफे, धाबे आणि ओयो हॉटेल्सवर धडक कारवाई!

क्राईम

टवाळखोर आणि मद्यपींवर पोलिसांचा थेट प्रहार; शाळा, कॅफे, धाबे आणि ओयो हॉटेल्सवर धडक कारवाई!

Editorial DeskBy Editorial DeskJune 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगा शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, आज सायंकाळपासून संपूर्ण शहर आणि परिसरात एकाच वेळी धडक मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या मोहिमेत प्रामुख्याने वाईन शॉपसमोरील परिसर, मोकळी मैदाने आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर (स्टॉल्स) उघड्यावर दारू पिणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच, महामार्गावरील (हायवे) परवाना नसलेली हॉटेल्स आणि धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्यांवर आणि पाजणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

शाळा, कॉलेज आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दुसऱ्या बाजूला, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात सायंकाळच्या वेळी वेगाने वाहने चालवणाऱ्या स्टंटबाजांवर आणि टवाळखोरांवर पोलीस नजर ठेवून आहेत. विशेषतः मॉडिफाय केलेले मोठे सायलेन्सर लावून शांतता भंग करणाऱ्या बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शाळा व कॉलेजच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर ‘कॉप्टा’ कायद्यांतर्गत थेट गुन्हे नोंदवले जात आहेत.

याशिवाय, शहरातील विविध कॅफे आणि ‘ओयो’ (OYO) हॉटेल्सची आकस्मिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली संशयास्पदरीत्या आढळत आहेत, तिथे कायदेशीर तपासणी करून कारवाई केली जात आहे. “नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असून, नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिला आहे. ही मोहीम अशीच पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add