Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला जेरबंद; बाजारपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

क्राईम

प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला जेरबंद; बाजारपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskApril 27, 2026Updated:April 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका महिला चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम सोन्याची पोत जप्त केली असून, या कारवाईमुळे बसस्थानकात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळीला मोठा चाप बसला आहे.

नेमकी घटना अशी की, मुक्ताईनगर येथील शिवराय नगरमध्ये राहणाऱ्या कुसुम देविदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत होत्या. याच वेळी गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समधून ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपासाची चक्रे फिरवली. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कसून तपासानंतर, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यावल येथील कुलसुमबी मुस्ताक शेख हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, तिच्याकडून चोरीस गेलेले पूर्ण सोने जप्त करण्यात आले आहे.

सध्या भुसावळ बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांमुळे प्रवाशांनी बसस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असला तरी, प्रवाशांनीही प्रवास करताना आपल्या दागिन्यांची आणि साहित्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ कांतीलाल केदारे करत आहेत.

crime crime news
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add