Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धक्कादायक : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून महिलेच्या डोक्यात घातला दगड !

क्राईम

धक्कादायक : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून महिलेच्या डोक्यात घातला दगड !

Editorial DeskBy Editorial DeskApril 28, 2026Updated:April 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेने तांबापुरा मच्छी बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील तांबापुरा भागात राहणारे युसूफ मुसा खटीक (वय ६४) यांची पत्नी सलमाबी या २६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या घराबाहेर पाणी भरत होत्या. यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमुद याने तिथे येऊन त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. सलमाबी यांनी या पैशांना स्पष्ट नकार दिला. या रागातून आरोपीने काहीही विचार न करता जवळच पडलेला दगड उचलून सलमाबी यांच्या डोक्यात मारला. या जीवघेण्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. आरोपीने इतक्यावरच न थांबता फिर्यादी युसूफ खटीक यांच्या खिशातील ५०० रुपयेही जबरीने हिसकावून नेले.

या हल्ल्यानंतर जखमी सलमाबी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोपीचे धाडस इतके वाढले होते की, उपचारादरम्यानही त्यांनी पीडित कुटुंबाचा पाठलाग सोडला नाही. २७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपीचे वडील मेहमुद शेख मेहबूब यांनी रुग्णालयाबाहेर युसूफ खटीक यांना गाठले. यावेळी त्यांना जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add