Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दहशत माजवणाऱ्या टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

क्राईम

दहशत माजवणाऱ्या टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 2, 2026Updated:May 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील समता नगर भागात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

​शाहीद फारुख शेख (वय १९, रा. समता नगर, जळगाव) हा ३० एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात होता. यावेळी समता नगरमधील कल्पना सैंदाणे यांच्या घरासमोर आरोपी अहमद उर्फ वसीम शेख कलीम शेख, समीर पिंजारी आणि इरफान पिंजारी हे तिघे मिळून मुशर्रफ शेख नावाच्या व्यक्तीला लोखंडी कोयत्याने मारहाण करत होते. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना, शाहीद हा हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला.

भांडण सोडवायला गेलेल्या शाहीदचा राग आल्याने तिन्ही आरोपींनी त्याला अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या दरम्यान, एका आरोपीने आपल्या हातातील लोखंडी कोयत्याने शाहीदच्या उजव्या हाताच्या दंडावर जोरात वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी करत धमकी दिली.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी शाहीदने तातडीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add