Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पुण्यातील सून हत्याकांडातील फरार सासर्‍याला जळगाव एलसीबीने ठोकल्या बेड्या!

क्राईम

पुण्यातील सून हत्याकांडातील फरार सासर्‍याला जळगाव एलसीबीने ठोकल्या बेड्या!

Editorial DeskBy Editorial DeskMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेल्या सासर्‍याला अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. भानुदास भास्कर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, एलसीबीच्या पथकाने मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील नांदेड सिटी परिसरात राहणारा आरोपी भानुदास चौधरी याचे त्याची सून स्वाती तेजस चौधरी हिच्यासोबत घरगुती कारणावरून वारंवार वाद होत होते. या वादाचे पर्यवसान २ मे रोजी भीषण घटनेत झाले. रागाच्या भरात भानुदासने स्वाती यांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो तिथून पसार झाला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे पोलीस मागील आठ दिवसांपासून आरोपीचा शोध घेत होते, मात्र तो वारंवार आपली ठिकाणे बदलत होता. दरम्यान, आरोपी भानुदास चौधरी हा जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तात्काळ हालचाली करत मेहरूणमधील महादेव मंदिर परिसरात सापळा रचला.

​पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याला अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. जळगाव पोलिसांनी या अटकेची माहिती पुणे पोलिसांना दिली असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add