Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव तालुक्यातील पिंप्राळा रस्त्यावर ही दुर्घटना घडली. महेंद्र रामचंद्र कोळी (रा. रायकवाड, ता. चोपडा, जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मजुरीचे काम करत होते. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कचरा वाहतूक ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याची प्राथमिक…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासमपुरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी मद्यधुंद अवस्थेत एका कुटुंबावर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासमपुरा येथील रहिवासी फिर्यादी शंकरदास हिरादास बैरागी (वय ५८) हे १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर बसलेले असताना ही घटना घडली. याच भागातील आरोपी अमोल लक्ष्मण चरावंडे आणि राधाबाई लक्ष्मण चरावंडे यांनी दारूच्या नशेत जुन्या भांडणाची कुरापत काढत शंकरदार बैरागी यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी अमोल याने रागाच्या भरात फिर्यादीच्या…

Read More

नशिराबाद प्रतिनिधी । शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच नशिराबाद येथील तैबा नगर भागात एका व्यक्तीला रस्ता अडवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख मेहमूद हे आपल्या कामासाठी जात असताना संशयित आरोपी शोएब बिल्डरने त्यांना गाठले. “तू इकडे कसा आलास?” असे म्हणत आरोपीने त्यांना शारीरिक इजा पोहचवण्यास सुरुवात केली. शोएब बिल्डरने शेख मेहमूद यांना खाली पाडून अमानुषपणे मारहाण केली. लाकडी काठीचा वापर करून अंगावर वळ उठेपर्यंत त्याला मारण्यात आले. या हल्ल्यात शेख मेहमूद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात…

Read More

फैजपूर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोरखेडा खुर्द गावात एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची आणि त्यानंतर जाब विचारणाऱ्या तिच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी चार संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ९ मे रोजी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी गावाबाहेर गेली असताना, गावातीलच संशयित आरोपी रोशन खलील तडवी याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. या घटनेनंतर काही दिवसांनी, म्हणजेच ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका लग्नाच्या पंगतीत संबंधित आरोपीने पिडीत महिलेच्या दिराला विनाकारण शिवीगाळ…

Read More

भडगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर आरोपीने मुलीचा विश्वास जिंकत तिचा गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सिमा परदेशी हीची आणि पिडीत मुलीची ओळख होती. संशयित आरोपी सिमा हीने तेजस मधुकर मराठे यांच्याशी पिडीत मुलीशी ओळख करून दिली. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवादातून संशयित आरोपी तेजस याने मुलीला विश्वासात घेतले. त्यानंतर भेटीगाठी वाढवत तिला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. अखेर मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला. घटनेनंतर मुलगी मानसिक धक्क्यात गेली होती. कुटुंबीयांनी विचारपूस केल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव पोलीस दलाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी १३ कलमी विशेष मोहीम आखली आहे. पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘Target Zero’ निश्चित करण्यात आले. या बैठकीला दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी, वाहतूक शाखा आणि हायवे स्टेट पेट्रोलचे (HSP) अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अशी असेल जळगाव पोलिसांची रणनीती:पोलिसांनी एमआयडीसी क्षेत्रातील ट्रक चालक आणि ग्रामीण भागातील…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरालगतच्या खडकी बायपास परिसरात एका किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यात पडलेल्या वाळूवरून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील सदस्यांवर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक पांडुरंग जाधव (वय ४७) हे १२ मे रोजी सकाळी आपल्या बैलगाडीने शेतातून चारा घेऊन घरी परतत होते. वाटेत रस्त्यावर पसरलेल्या रेतीवरून त्यांची बैलगाडी गेल्याने स्थानिक आरोपींनी त्यांना अडवले. साध्या वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाला आरोपींनी हिंसक वळण दिले. हा वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी लोखंडी रॉडने जाधव कुटुंबावर हल्ला चढवला. यात…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डंगर बुद्रुक ते चोपडाई दरम्यान मंगळवारी १३ मे रोजी सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास एका भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार शिवाजी भगवान सैंदाणे हे जागीच गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी सैंदाणे (रा. कोडावळ) हे डंगर बुद्रुककडून आपल्या दुचाकीने (एमएच १९ बीएफ ०५८८) जात असताना, धुळ्याकडून येणाऱ्या किआ सोनेट कारने (एमएच १९ ईजी ०५८८) त्यांना जोरदार धडक दिली. धडक…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चक्क बसस्थानक परिसरातून भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवासी, विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवाशी मिनाक्षी जितेंद्र पाटील (वय ३०) या १२ मे रोजी काही वैयक्तिक कामासाठी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास यावल बसस्थानक परिसरात आल्या होत्या. बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने मिनाक्षी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अत्यंत शिताफीने तोडून चोरून नेली. या पोतमध्ये सुमारे १२…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून, प्रशासनाने दिलेला ‘येलो अलर्ट’ आता जीवावर बेतू लागला आहे. संसाराची नवी स्वप्ने डोळ्यात घेऊन अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या वैशाली सुनील भील (मोरे) या नवविवाहितेचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील सुनील भील यांच्याशी वैशालीचा विवाह २३ मे २०२६ रोजी झाला होता. लग्नाची धामधूम संपते न संपते तोच, वैशाली पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी तिथून परतल्यानंतर तिला थकवा जाणवू…

Read More