Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

जळगाव

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Editorial DeskBy Editorial DeskMay 17, 2026Updated:May 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा महानगर आणि जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसांत रक्ताची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेऊन वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळत हा विधायक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचा शुभारंभ महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रक्तदान करून केला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिरात माजी महापौर सुनील खडके, आरोग्य सेवक शिवाजी पाटील, पितांबर भावसार, यश पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.

कार्यक्रमास नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक नितीन सपके, उदय भालेराव, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका सुचिता हाडा, डॉ. राधेश्याम सूर्यवंशी यांच्यासह भाजप, युवा मोर्चा आणि जी. एम. फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त होणारी बॅनरबाजी, फलकबाजी आणि अन्य अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देण्यात आल्याने या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून अनेकांना नवे जीवन मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add