Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»‘भंगाळे गोल्ड’कडून मनपा नियमांची पायमल्ली; दुभाजक विकास कामाचा करार रद्द करण्याची मागणी

क्राईम

‘भंगाळे गोल्ड’कडून मनपा नियमांची पायमल्ली; दुभाजक विकास कामाचा करार रद्द करण्याची मागणी

Editorial DeskBy Editorial DeskMay 18, 2026Updated:May 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या प्रमुख मार्गावरील दुभाजक सुशोभीकरण आणि देखभाल कामात ‘भंगाळे गोल्ड’ व्यवस्थापनाकडून महानगरपालिकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून, संबंधित करार तातडीने रद्द करण्याची आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था व व्यावसायिकांना परवानगी दिली जाते. मनपाच्या नियमानुसार, या दुभाजकांवर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी आणि ६० टक्के जागा स्वतःच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसेच दोन फलकांमध्ये किमान १० मीटर (३२.५ फूट) अंतर असणे आवश्यक आहे. मात्र, भंगाळे गोल्डने या नियमांना हरताळ फासत फलकांवर १०० टक्के स्वतःच्याच व्यवसायाची जाहिरात केली असून मनपाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच १० मीटर अंतराचा नियमही पाळलेला नाही.

तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भंगाळे गोल्ड व्यवस्थापकांचे पुतणे हे मनपात सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक आणि माजी महापौर असल्याने, ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून प्रशासनावर दबाव आणत आहेत. भंगाळे गोल्डने यापूर्वीही शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावले होते, ज्यावर मनपाने दंडात्मक कारवाई केली होती. एकीकडे सर्वसामान्य आणि लहान व्यावसायिकांवर कठोर कारवाई करणारे मनपा प्रशासन या धनदांडग्यांवर काय कारवाई करते, याकडे आता संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागून आहे. या संदर्भात महापौर, आयुक्त आणि पर्यावरण विभाग अभियंत्यांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add