Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»मनपाचा पर्यावरणपूरक पॅटर्न; ‘नो-व्हेईकल डे’ला जोरदार सुरुवात, महापौरांची सायकल रपेट!

जळगाव

मनपाचा पर्यावरणपूरक पॅटर्न; ‘नो-व्हेईकल डे’ला जोरदार सुरुवात, महापौरांची सायकल रपेट!

Editorial DeskBy Editorial DeskMay 20, 2026Updated:May 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । वाढती इंधन टंचाई आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पालिकेने दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आज पहिल्याच दिवशी त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. या मोहिमेचे नेतृत्व स्वतः महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले. त्यांनी घरातून थेट मनपा कार्यालयापर्यंत सायकल चालवत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला.

जागतिक पातळीवरील इंधन संकट आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, महापौरांनी आयुक्तांना यासंदर्भात लेखी आदेश दिले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण पालिका प्रशासन पर्यावरणपूरक रंगात रंगलेले दिसले. उपमहापौर आणि उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी ई-बाईकचा वापर केला. तर उपायुक्त धनश्री शिंदे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी थेट पायी चालत कार्यालय गाठले. गटनेते विष्णू भाऊ यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी ‘कार आणि बाईक शेअरिंग’चा सुजाण पर्याय निवडला.

“पर्यावरण संरक्षण ही केवळ घोषणा न राहता ती काळाची गरज बनली आहे. प्रशासनाने स्वतःपासून सुरुवात केल्यास नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल,” असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर बुधवारी कर्मचाऱ्यांना सायकल, ई-वाहने किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. केवळ जळगाव पालिकेपुरता मर्यादित न राहता, हा उपक्रम संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी चिन्हे आहेत. आगामी काळात या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add